पुणे

भारती विदयापीठ पोलीसांनी केल्या विधीसंघर्षीत बालकांकडुन महागडया गाडयांच्या बॅट-या जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठांनी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या करता तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे गुन्हयांना आळा बसावा म्हणुन पेट्रोलीग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व आशिष गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आंबेगांव गायमुख परिसरामध्ये दोन लहान मुले ही त्यांचेकडे असलेल्या बॅट-या रस्त्याने ये-जा करणा-या मोटार सायकल स्वरांना विक्री करीत आहेत. तात्काळ बातमीची खातरजमा करण्याकरीता तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे आंबेगांव गायमुख परिसरामध्ये गेले असता गायमुख चौकाचे थोडे अलिकडे मॅगो हॉटेलकडे जाणा-या रोडवर दोन लहान मुले ही SF Sonic कंपनीची एक बॅटरी व NXTER RIOO कंपनीची एक व EXIDE XPRESS कंपनीची एक अशा तीन बॅट-यांसह मिळुन आले.

त्यांचेकडे त्या बॅट-यांबाबत तपास करता त्यांनी त्या बॅट-या आंबेगाव व धनकवडी भागातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन तीन बॅट-या व एक दुचाकी गाडी असा एकुण ५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ८११/२०२२, भादंवि कलम ३७९ व सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २४७/२०२२ भादंवि कलम ३७९ अन्वये दोन गुन्हा उघडकीस आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, अमर भोसले, शैलेश साठे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!