क्राइमताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

मटकाजुगार अड्डायासाठी दबाव कोणाचा, कितीही तक्रार करा तरी फक्त बघ्याची भुमिका का..?

सिंहगडरोड, पाषाण व बालेवाडीत मटकाजुगार अड्ड्यांचा हैदोस, राजरोस गोरगरीबांची सुरू आहे लुट..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे हे सांगण्याची आवश्यकताच नाही परंतू पुणे या विद्येच्या माहेरघरातच जुगारचे धडे गिरविल्या जात आहेत. हो हे वाचुन विश्वास बसला नाही तर मग बातमी संपुर्ण वाचा व आपल्या समाजास वाचवा.

सिंहगडरोड अवैध्य जुगार अड्डा:

https://maps.app.goo.gl/TFT4dmbEB6pvmNBw6

पुणे शहरात सिंहगडरोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे विर बाजीराव पासलकर चौकाजवळ असलेले साई सलोनी फिश मार्केट मागे पत्र्याचे शेड बांधुन अवैध्य धंद्यामुळेच तडीपार असलेल्या मालकाचे मटकाजुगारचा अड्डा वर्षानुवर्ष सुरू आहे. या मालकाचे फक्त सिंहगड रोड येथेच नव्हे तर कोंढणपुर फाटा हाॅटेल मुक्तांगण पाठिमागे घोलप बिर्याणीच्या शेजारील गल्ली मध्येही पहिल्या पत्र्याच्या शेडमध्ये मटकाजुगार व त्याच्याच मागे पत्याचा कल्ब सुरू आहे हे सर्व काही काळाकरिता वेळनुसार बंद केलेही जातात व पुन्हा राजरोस सुरू होतात या अवैध्य जुगार अड्ड्या संदर्भात 112 क्रमांक वरती तक्रार दिली तरी समोरील पोलीस म्हणून फोन करणारे आपणांस समोर बोलवितात व तुम्ही सोबत चला मग आम्ही कार्यवाही करतो असे सांगतात असा अनुभव सर्वसामान्यास येत आहे परंतू मटकाजुगार अड्डे काही करो बंद होत नाही पोलीस वेळे अभावी दिरंगाई करू शकतात पण आपत्कालीन क्रमांक 112 या क्रमांकावर वारंवार येणारे गांभीर्यपूर्वक फोन संदर्भात कारवाई करणे टाकत नाहीत पण या तडीपार आरोपीच्या जुगार अठ्ठायावरच मेहरबानी नेमकी कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे की राजकीय दबाव आहे हे कोडे काही सर्व सामान्यास नागरिकांना सुटत नाही.

पाषाण सुस रोड बालाजी चौक मटका जुगार अड्डा;

https://maps.app.goo.gl/DpcAyVgwRZcQnDb38

असो तर असेच उदाहरण बाणेर पाषाण येथेही आहे काही जुने मालक बदलुन पाषाण सुस रोड येथील बालाजी चौका लगत 4M कार डेकोर शेजारील गल्लीमध्ये पत्र्याचे शेड मध्ये कदम नावाच्या मालकाने पैश्यावरती मोठ्याप्रमाणात जुगार अड्डा, सोरट सुरू केला आहे. तर कष्टकरी गोरगरीब जनतेला देशोधडीस लावण्यासाठी बालेवाडीमध्ये गिनी विणीया या सोसायटी लगतील पत्र्याच्या शेटमध्ये साजरोस जुगार अठ्ठा सोरट, गुडगुडी, पंतीपाकुळी असे विविध नावे जुगार सुरू आहे.

बालेवाडी येथील मटकाजुगार अड्डा;

https://maps.app.goo.gl/hSxaTYCm2JGzM5Zs9

खेडशिवापुर येथील मटकाजुगार व पत्याचा क्लबचा पत्ता:

https://maps.app.goo.gl/QJVzxQ7vMe9qvf5R8

समाजातून जुगार कायमस्वरुपी बंद व्हावी यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी, संघटना, पत्रकार बांधव यांनी एकत्रीत लढा देण्याची गरज आहे दिलेल्या सर्व अवैध्य धंदेबाबत आपणही स्वतः तक्रार देवुन व पत्रकार बांधवांनी बातमी प्रसारित करून अवैध्य धंदे कायमस्वरूपी बंद होई पर्यंत आपल्या परीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे आपल्या मदतीसाठी सर्व बातमी संदर्भात सुरू असलेल्या अवैध्य धंदेबाबत लोकेशन दिलेले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!