महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा,अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथील बैठकीत केली.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र उपस्थित होते.
सीमाप्रश्न संवैधानिकरित्या सोडविला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्या सोडवाव्यात. कायदा सुव्यवस्थेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत समिती नेमा.
–केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
सीमाभागातील मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील. सीमाभागातील जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंभीरपणे उभे आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनांवर कार्यवाही करून या भागात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जाईल- मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
महाराष्ट्र राज्याकडून सीमावाद प्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका केंद्र शासनाने मांडली आहे- उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री Devendra Fadnavis –
देवेंद्र फडणवीस