महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास कोटींचा गंडा घालणाऱ्यां ठेकेदारावर आशिर्वाद कोणाचा ?
पुरावे असतांना पाच महिणे गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले ? नेमकी चोराला वाचवते तरी कोण?
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या कामातील एक ठेकेदार बी.जे.समृत या विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे बोगस बॅक गॅरंटी देवून शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरी हा गुन्हा दाखल करण्यात आला तरी ह्या गुन्हाची व्याप्ती खुप मोठी असुन या सर्व प्रकरणाचा सुरूवातीपासून पाठपुरावा श्रीकांत दारोळे यांनी घेतला होता मागिल दोन आठवड्या पुर्वी सदर बी.जे.समृत या कंपनीवर गुन्हया नोंद होण्याची बातमी वर्तमान टाईम्स वृत्तसेवेने प्रसारित केली होती तर माहिती अधिकाराचा योग्य वापर करत सदरची सर्व बोगस कागदपत्रे मिळाल्यामुळे पर्यायनाही हे लक्षात आल्यामुळेच हा गुन्हा उशीरा म्हणजेच तब्बल पाच महिण्यानंतर दाखल करुन घेतला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी कागदोपत्रीच घोडे नाचवत होते परंतु बोगस कागदपत्र पुराव्यासह ताब्यात घेवुन कार्यकारी अभियंता, विभाग क्रमांक 01,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करत या फसव्या बी.जे.समृत ठेकेदाराचे सर्व बिल थांबवुन फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी 14 सप्टेंबर रोजी दारोळे यांनी केली होती, दारोळे यांच्या जवळील पुराव्याची उपलब्धता बघता तक्रारीची दखल घेत 20/10/2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला फक्त ठेकेदाराकडून खोटी बॅक गॅरंटी सादर केल्याबद्दल गुन्हा जरी दाखल केला तरी सदरचे काम मिळवण्यासाठी 20 लक्ष रुपयांची अनामत रक्कम बोगस भरणा केल्याचे पत्र सदर ठेकेदाराने सादर केलेले आहे तर बोरीपारधी येथील कामासाठी 90,06,838,00 लक्ष, स्टेट बॅक ऑफ इंडिया बॅकेची बोगस बॅक गॅरंटी सादर करून जमवाजमव उचल स्वरूपी 38,57,000 लक्ष एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात निमूट पणे घेतली यास एक वर्ष झाले तरी कुठलीही चर्चा नाही कोणालाही या बाबत माहिती नाही हे विशेष यास शासकीय अधिकारी यांच्या सहयोगा शिवाय होणे शक्य नाही या 38,57,000 लक्ष बोगस कागदपत्रच्या आधारे देणारे तत्कालीन जबाबदार अधिकारी कोण ? आज पर्यंत सुरू असलेल्या गुन्हा नोंद प्रक्रीया सुरू असतांना काम का सुरू ठेवले बिले देण्याची तयारी कोणाच्या दबावाने होत होती असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
बदली करून जरी तत्कालीन अधिकारी गेले असले तरी शासनाची फसवणूक करून चोरी केलेली लपनार नाही. शासकीय पगार असतांना आपल्या मुलांच्या लग्नात लाखो लाखो रुपये उधळण्यास आले तरी कोठून ? कसे याची ही चौकशी झाली पाहिजेत.
श्रीकांत दारोळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई व सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पुराव्यासह करणार आहेत या करोडो रुपयांचे बोगस कागदपत्रे शासनास सादर करून लाखो रुपयांचे देवाणघेवाण झालेली आहे.
मुंबई येथे सदर पडताळणीसाठी गेलेले कर्मचारी यांना सदर ठेकेदारांने शांत रहा मी साहेबांसोबत बोललो कामे सुरळीत सुरू ठेवा असे सांगितले आहे, तुम्ही कोणाला काही बोलू नका..! असे संभाषणाचेही पुरावे आहेत हे काम सुरळीत सुरू ठेवण्यास सांगणारे तत्कालिन अधिकारी कोण आहेत या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे या भ्रष्ठाचारी व्यात्पी मोठ्याप्रमाणात असण्याची दाट शक्यता आहे.
सदर ठेकेदार बी.जे.समृत यांचे नाशिक येथेही काही भागात काम सुरू असल्याची माहिती मिळत आहेत तेथील कागदपत्रांची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे हे बनावट बॅकचे कागदपत्रे येवढी हुबेहुब कोणी बनवुन दिली ? त्यासोबत बनावट बॅकेचा स्टॅम्प, 500 रुपयांचे स्टॅम्प पेपरवर खोटी माहिती भरण्यात आलेली आहे गुन्हा जरी बी.जे.समृत वर दाखल झाला असला तरी सह आरोपी संख्या जास्त असणार आहे व बनावट कागदपत्रांचा वापर कुठे कुठे केला आहे किती फसवणूक आज पर्यंत केली गेली हे पोलीसांना शोधून काढावे लागणार आहे.
उर्वरीत पुण्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सर्व ठेकेदार यांनी सादर केलेले कागदपत्रेही तपासले गेले पाहिजेत जेणे करुन शासनाची फसवणूक करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल ज्या कामाची सुरूवात खोट्याने झाली आहे तर कामाची गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.