ताज्या घडामोडी

महाराष्ट्र टपाल विभागाच्या निवृत्तवेतनधारकांसाठी होणार 52′ वी पेंशन अदालत..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत  दिनांक 16-032023  रोजी 11.00 वाजता  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.

पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांची प्रकरणे ई. वारसा प्रमाणपत्र कल्पित पेन्शन टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या  पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तीन प्रति, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 15022023 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुप ने (एकगठ्ठा/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकतात.

15-02-2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.  

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!