ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

महार वतनाच्या जमिनी वतनदारांच्या वारसांना परत करा या मागणींसाठी आरपीआय (A) पक्षाच्या वतीने आमरण उपोषण

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- राज्यातील महार वतनाच्या जमिनी वतनदारांना वतनदारांच्या वारसांना परत (रिस्टोर) करा या मागणींसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गटाच्या) वतीने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया (ए) चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अशोक गायकवाड यांनी दिला आहे.

या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे दि. २९/११/२०२३ रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे , विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेल्या हककांच्या वतनाच्या जमिनी आम्हाला मिळाल्याचं पाहिजे गावातील धनधांडग्या लोकांनी प्रतिष्ठित समाजाने, राजकारणी, सावकारांनी महार वतनाच्या जमिनी कवडीमोल भावात धाक धपटशा दाखवुन अन्यायाने विकत घेतल्या असतील तर त्या सर्व जमिनी वतनदारांना परत करुन द्या त्या रिस्टोर करा. वतनदार किंवा त्यांचे वारस यांचे उपजिविकेचे साधनापासुन वंचीत रहात आहेत.

महार वतनाच्या जमिनी प्रतिष्ठित समाज्यातल्या धनधांडग्या लोकांनी बळजबरीने कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत किंवा कुळकायद्याने जमिनीवर ताबा मिळविला आहे. बऱ्याच महार वतनी जमिनी बेकायदा किंवा कायद्याने रद्द होऊ शकणारे हस्तांतरण मागासवर्गीय समाजा व्यतिरिक्त (नॉनबेकवर्ड) जमातीच्या कब्जात गेल्या असुन ते नविन शर्ती विरोधी कृत्य आहे. तसेच अनधिकृत ताबा असलेल्या जमिनी त्या सर्व जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण केवळ १०० रु. च्या स्टॅम्पवर कोणतेही खरेदीखत न करता मागासवर्गीय समाजातील अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवुन परस्पर पैशाचा वापर करुन तलाठ्याद्वारे नोंदी करुन घेतलेल्या असुन सदरच्या नोंदी ह्या बेकायदेशीर व कायद्याला अनुसरुन नाहीत. अशा बेकायदेशीर नोंदीमुळे शासनाचा कर बुडवून खरेदी झालेल्या असुन सदरच्या सर्व जमिनी महार समाजाला लवकरात लवकर परत रिस्टोर करण्यात याव्या अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए )पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे दि. २९/११/२०२३ रोजी आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचे माहिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अशोक गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!