महा बोधी न्युज चॅनलच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- महा बोधी न्युज चॅनलच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त तुझ्या रक्ता मधला भिम पाहू दे.फेम भाग्यश्री इंगळे यांच्या सुमधुर गीतांच्या कार्यक्रम व व्याख्यानासह स्वच्छता अभियान व मतदानाचे महत्व आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पूर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कारासह गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक प्रदीप नन्नवरे यांनी दिली.
सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल. संतोष एकलारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे, सचिन पाटील, महा बोधी न्युज चॅनल संचालक,भाईसाहेब जाधव बहुजन युथ पँथर राष्ट्रीय अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असेल.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. गणेश जोशी यांचे व्याख्यान होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आशिष वाकोडे, संदीप ढगे, सोमनाथ सोलव, राजकुमार सूर्यवंशी, शेख सोहेल, रवी गायकवाड, विशाल कांबळे, शिवहार सोनटक्के, राजू नारायणकर, नागेश एंगडे, शेख नसीर, दीपक रणवीर, मोहम्मद शफीक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रदिप नन्नवरे महा बोधी चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मनोज भुजबळ शेख समी, दिलीप काळे, प्रेम गायकवाड, अभिनय भारत, यांनी केले आहे.