मुंबई पोलीसांनी शहरात एकत्रित राबविले All Out Operation..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- बृहन्मुंबई शहरात दि. ०७/०२/२०२३ ते दि. ०८/०२/२०२३ दरम्यान All Out Operation राबविण्यात आले होते. मुंबई शहरातील सर्व ०५ हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, वाहतुक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, १४ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा / सुरक्षा, २८ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात All Out Operation ची कार्यवाही केली आहे.
पोलीस आयुक्त, श्री विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी व कोबिंग चे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व All Out Operation प्रभावीपणे राबविण्यात आले आहे.
All Out Operation मध्ये पुढील कारवाई करण्यात आली आहे.
• मुंबई पोलीसांच्या रेकॉर्डवरील २८ पाहिजे / फरारी आरोपीतांना (Wanted / Absconder ) अटक करण्यात आले आहे.
• एकुण ९५ अजामीनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) ची बजावणी करून आरोपीतांना अटक करण्यात आली.
• अंमली पदार्थ खरेदी / विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा (NDPS ACT) अन्वये एकुण १४९ कारवाया करण्यात आल्या.
• अवैध शस्त्र ( Illegal weapons ) बाळगणाऱ्या एकुण ३५ कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली.
• अवैध दारू विक्री / जुगार इ. अवैध धंदयांवर ४१ ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यादरम्यान ६८ आरोपीतांस अटक करण्यात आली.
• महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १४२, १२०, १२२ व १३५ अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण १७३ कारवाया करण्यात आल्या आहेत.
• बृहन्मुंबई शहरात एकुण २३३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील ७८७ आरोपी (रेकॉर्डवरील ) तपासण्यात आले. त्यामध्ये २८ आरोपी मिळून आले. त्यांचेवर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
• सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण १०० ठिकाणी नाकाबंदी (Nakabandi) लावण्यात आली होती. त्यामध्ये एकुण ८१६८ दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली तर मोटार वाहन कायद्यान्वये ५७४७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम १८५ मोवाका अन्वये १५ वाहन चालकांवर Drunk & Drive ची कारवाई करण्यात आली.
• बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण १११३ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.
• प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे असे एकुण ६७१ तपासणी करण्यात आले आहे.