ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; पोलीस ठाण्यात नेमके काय घडले?

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुलाला पोलीस ठाण्यात सोडवण्यास आलेल्या 65 वर्षीय राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकाऱ्याचा पोलीस ठाण्यातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दीपक भिंगारदिवे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेबाबत ट्विट करत पोलिसांवर निशाणा साधला आहे. भिंगारदिवे यांना फिट आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात भिंगारदिवे कुटुंब राहतं. शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास प्रशिक भिंगारदिवे या तरुणाला कोळसेवाडी पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. पोलीस आपल्या मुलाला का घेऊन गेले? याबाबत जाणून घेण्यासाठी प्रशिकचा भाऊ गौरव आणि वडील दीपक भिंगारदिवे हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले. यावेळी भावाची चौकशी करत असताना प्रशिक हा तपास कक्षात बसला असल्याचं त्यांनी पाहिलं.

यावेळी साधारण पावणे दहा वाजले होते. मुलाची चौकशी करण्यासाठी वडिल पुढे गेले. यावेळी वडिलांचा कॅमेरा चुकून सुरु झाला असं गौरव भिंगारदिवे यांनी दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि ते दीपक यांना घेऊन गेले. माझ्या वडिलांचा मोबाईल पोलिसांनी काढून घेतला. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करता का? असा जाब विचारत त्यांची कॉलर पकडत त्यांना हाताने मारहाण केली असा आरोप करण्यात आला. यानंतर पोलीस दीपक यांना घेऊन लॉकअपकडे गेले. साधारण 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गौरव भिंगारदिवे यांना बोलावून घेतलं. तुमच्या वडिलांना फिट आली आहे असं त्याला सांगितलं. गौरव जेव्हा हे पाहण्यासाठी गेला तेव्हा लॉकअप बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत दीपक भिंगारदिवे हे खाली पडून होते. त्यांना नजीकच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

तिथे डॉक्टरांनी गाडीतच तपासून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता दीपक हे मयत झाले असल्याचं सांगण्यात आले. दीपक यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, वडिलांचा मृत्यू फिट आल्याने झाल्याचं पोलीसांकडून समजलं असलं तरी मृत्यूच नेमकं कारण काय? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गौरव याने नमूद तक्रारीत केली आहे. त्याचप्रमाणे वडिलांना डायबिटीसचा आजार असून, त्यावर त्यांची औषध सुरू आहे, असा उल्लेख देखील तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दीपक भिंगारदिवे यांचा पोलीस चौकीत कोणताही गुन्हा नसताना झालेल्या मारहाणीमुळे चौकीत मृत्यू झाला. जे उपस्थित होते आणि ज्यांनी त्याला आणले त्या सर्वांवर एफआयआर नोंदवावा कृपया प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करू नका. असे लिहून सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!