ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

मेडिकल कॉलेजच्या जागेतील लोखंड पत्रा, विट लाकुड व काळेश्वरी देवीच्या दानपेटीतील रकमेची व दागिन्या वर दरोडा कोणाचा..!!

मा.दादासाहेब ओव्हाळ यांच्या दरोडा टाकणाऱ्या आजी माजी ट्रस्टीच्या मालमत्तेची सीआयडी चौकशी करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- रिपब्लिकन पक्षांचे नेते व सातारा जिल्हाअध्यक्ष मा. दादासाहेब ओव्हाळ यांनी सातारा जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यांनी या पूर्वीही वेळोवेळी संबंधित अधिकारी यांने निवेदन देऊन कारवाई न झाल्यामुळे आंदोलन केली आहेत पण हेतुपूर्वक काही समाज कंटक व्यक्तींना वाचविण्यासाठी ठोस चौकशी व कारवाई होत नसल्या कारणाने दादासाहेब ओव्हाळ यांनी निवेदन देऊन आमरण उपोषण सुरू केले आहे.

निवेदना मध्ये मा. जिल्हाधिकारी साहेब यांना विस्तृत माहिती दिली होती की, मेडिकल कॉलेजच्या जागेमध्ये जुन्या इमारती उतरवत असताना तेथील कोणत्याही इमारती उतरवण्याचे कसल्याही प्रकारचे टेंडर न काढता तेथील लोखंड, लाकूड, पत्रा, विटा, रॅबिट चोरणाऱ्या वरती दरोड्याचे गुन्हे दाखल करावीत या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली होती, परंतु शासनास जाग येत नाही त्यामुळे या संबंधित प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. मेडिकल डीन व न्याती बिल्डरचे सुपरवायझर मुल्ला यांचे कॉल डिटेल तपासल्यानंतर खरे चोर कोण आहे ते समोर येईल कारण सार्वजनिक बांधकाम उप अभियंता भंपलवार भाष्य करण्यास तयार नाहीत, मेडिकल कॉलेजचे डिन चव्हाण यातील काहीच माहिती नाही असे बोलतात, तर धोम पाटबंधारे सिंचन विभागाचे पाटील हे सुद्धा कुठल्याही प्रकारचे भाष्य करत नाहीत ते सांगतात की आम्ही 2018 मध्ये इमारती आरोग्य मंत्रालयाच्या ताब्यात दिलेले आहेत.

तरी या प्रकरणांमध्ये काही अधिकारी सह संबंधित कॉन्ट्रॅक्टर न्याती बिल्डरचे मुल्ला, बालाजी सिक्युरिटी समोर कोट्यावधी रुपयाचे साहित्य चोरून नेत असताना दहा जीसीपी, पाच पोकलॅण्ड, सात ट्रॅक्टर, 25 डंपर व 100 लोक आठ दिवस ही चोरी राजरोसपणे करत होते. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने वेळोवेळी निवेदन देऊन हे प्रशासनासमोर आणून देण्याकरता दोन वेळा आंदोलने केली होती. तरी सुद्धा यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवार दिनांक 26/12/2022 रोजी अकरा वाजल्यापासून सुरू करीत आहोत या संबंधित प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींच्या बगलबच्च्याला वाचवण्याकरता काही लोकप्रतिनिधी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे या खोटा अपप्रचार करत आहेत पाठिंबा देत असल्याचा बनवा करत आहेत परंतु यामध्ये न्याती बिल्डरकडे कोणत्या प्रकारच्या मागण्या करून आपल्या बगलबच्चाना कामे दिली याचं आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधीच करावे विनाकारण चोरांना पाठीशी नये.

तर महाराष्ट्र सह इतर राज्यातील लाखो भाविक अमोशा पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार तसेच जानेवारी महिन्यातील पोषपौर्णिमेलाच्या दिवशी लाखो भाविक येतात त्यामुळे अनेक प्रकारच्या देणग्या रकमा ते देतात आणि त्यातच या काही लोकांनी अपहार केलेली आहे त्याचीही चौकशी करावी यासाठी त्यामुळे वेळप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली मा. न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महिला आघाडीच्या पूजा बनसोडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी दिली.

 

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!