मेफेड्रॉन (एम. डी.) अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांना कोथरुड पोलीसांनी ठोकल्या बेडया..!!
०६ ग्रॅम ७५० मिली ग्रॅम वजनाचे एम. डी. सह १,९८,२५०/- रु. कि. मुद्देमाल जप्त.!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- व्हु सोसायटीचे समोरील चहाचे टपरीजवळ महात्मा सोसायटी रोड येथे दोन इसम मेफेड्रॉन (एम. डी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत अशी बातमी अधिनाथ चौधर, संजय दहिभाते यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब बडे यांचे सह पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार अधिनाथ चौधर, योगेश सुळ, संजय दहिभाते, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके, दादा भवर असे बातमीचे ठिकाणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे हे दबा धरून बसले असताना बातमीप्रमाणे वर्णनाचे दोन संशयित इसम बुलेट मोटारसायकल वरून येवुन चहाचे टपरीजवळ थांबले.
बातमीप्रमाणे वर्णनाचे इसम असल्याची खात्री झाली असता स्टाफने विभागुन येवून रवि मोहनसिंग राठोड उर्फ बिल्ला व आदित्य संदीप माण यांना मोटारसायकल सह ताब्यात घेवून एन. डी. पी. एस अॅक्ट प्रमाणे झडती घेतली असता आरोपींकडून एकूण ०६ ग्रॅम ७५० मिली ग्रॅम वजनाचे एम. डी. किंमत १,०१,२५०/रु.चे २ ) ०३ मोबाईल, २७,००० /-रु. कि. ३) ७०,००० /- रु. कि. एक बुलेट मोटारसायकल असा एकूण १,९८,२५०/- रु. कि. मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुध्द गुन्हा रजि नं २८९ / २०२२ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क), २१(ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस उपआयुक्त श्री सुहेल शर्मा यांचे अधिपत्याखाली मा. सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेंद्र जगताप, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे तपास पथक प्रभारी अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी व तपास पथकातील अंमलदार अधिनाथ चौधर, योगेश सुळ, संजय दहिभाते, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके, दादा भवर यांनी कामगिरी उत्कृष्ट कामगिरी केली.