ताज्या घडामोडीपुणे

मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बारवर कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मुंढवा परीसरात पेट्रोलिंग करीत असताना ताडीगुत्ता रोड, मुंढवा येथील बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बार मध्ये मोठया आवाजात साऊंड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले होते.

त्याची खातरजमा केली असता बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बार येथे मोठया आवाजात साऊंड सिस्टिमवर संगीत सुरू असल्याचे आढळल्याने, हॉटेेलव  कारवाई करून ०३,३०,०००/- रू किचे साऊंड सिस्टिम जप्त केली असुन, हॉटेल मालक व मॅनेजर विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करण्यासाठी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे..

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!