येरवडा पोलीसांनी केला नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळयांचा साठा जप्त..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :– पुण्याच्या येरवडा परिसरातून पोलिसांनी नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळयांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूध्द येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असिफ अकबर शेख (19, रा. गल्ली नं. 7, राजीव गांधीनगर, येरवडा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. एक व्यक्ती राजीव गांधी परिसरात मानवी मनावर परिणाम करणार्या नशाकारक आणि गुंगीकारक औषधी गोळयांची अवैध्यरित्या विक्री करीत असल्या बाबतची माहिती पोलिस अंमलदार अमजद शेख आणि अनिल शिंदे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची पोलीसांकडून खातरजमा करण्यात आली व सापळा रचुन असिफ अकबर शेख याला शितफीने अटक केली. त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाच्या पिशवीमधून 2 हजार 200 रूपये किंमतीच्या नशाकारक व गुंगीकारक गोळयांच्या 22 स्ट्रीप्स जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव , वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम , पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे , पोलिस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे आणि अश्विन देठे यांच्या पथकाने केली आहे.