ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे मुंबईत नवे कार्यालय

मुंबई,निर्भीड वर्तमान:- राज्यातील सर्व महत्त्वाची कार्यालय ही मुंबई येथे आहेत. त्यामुळे लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन कार्यालय निष्ठा भवन, चौथा मजला, सीजीओ बिल्डिंग, चर्चगेट मुंबई येथे सुरू येथे सुरू करण्यात आले आहे. हे कार्यालय महाराष्ट्र व गोवा या राज्यासाठीचे राज्य कार्यालय असणार असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

अनुसूचित जातींसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगामार्फत घेण्यात येतो. योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आयोगामार्फत राज्याच्या विविध विभागांना निर्देश देण्यात येतात. अनुसूचित जातीच्या समाजातील समस्यांचे निराकरण मुंबई येथील कार्यालयातून करण्यात  येणार असुन,आयोगाने ऑनलाइन पोर्टल सुरू केलेले आहे त्यामुळे ऑनलाईनही तक्रार नोंदविता येणार आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

अनुसूचित जातीतील समाजाच्या लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मुंबई येथील कार्यालय हे सोयीचे झाले आहे. राज्यातील सर्व भागातील लोक मुंबई येथे कामानिमित्त येतात. सर्व क्षेत्रिय कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे लोकांना मुंबई येथे येणे सोयीचे आहे. यामुळे सामान्य नागरीकाना मोठा फायदा होणार आहे. सहसचिव दिनेश डिंगळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक कौशल कुमार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. तर मागासवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, अंजू बाला, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!