रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती
मुंबई, निर्भीड वर्तमान :- महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे नातू सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार तथा महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष समाजभूषण मा.काकासाहेब खंबाळकर यांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांची आज ऐतिहासिक वास्तू राजगृह, मुंबई येथे महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शशिकांत कांबळे हे गेल्या 20 वर्षांपासुन अविरतपणे समाजासाठी धडाडीने काम करत आहेत.आपल्या रिपब्लिकन संघर्ष सेनेचा महाराष्ट्रभर आवाका वाढवत समाजावर होणार्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा लढा कांबळे यांनी उभारला आहे.
नियुक्तीपत्र दिल्यानंतर सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांनी शशिकांत कांबळे यांचे अभिनंदन करत आपण दिलेल्या पदाला न्याय देताल असा विश्वास असल्याचे मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्र समाजभूषण मा. काकासाहेब खंबाळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शशीकांत कांबळे यांच्या महाराष्ट्रभरातील दांडगा जनसंपर्क बघुनच आम्ही येवढी मोठी जबाबदारी दिल्याचे सांगितले महाराष्ट्र भरात आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते मोठ्यासंखेने रिपब्लिकन सेनेमध्ये सामिल होत आहेत. शशिकांत कांबळे भर घालतील यात काही शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
आज पर्यंत समाजासाठी निस्वार्थपणे केलेल्या कामाची हि पोच पावती आहे स्वतः सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांनी आमचे श्रध्दास्थान असलेली ऐतिहासिक वास्तू राजगृह येथे नियुक्ती केली आहे. मी माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण एकनिष्ठेने पार करत महाराष्ट्रभर गाव तेथे शाखा करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र प्रदेश संघटक मा.शशिकांत कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असतांना दिली आहे.