रिपाई (आ) : विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडुन आणण्याच्या तयारीला लागा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, निर्भीड वर्तमान:- आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची भाजप महायुती सोबत युती निश्चीत असुन महायुतीतुन रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर किमान 6 आमदार निवडुण आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. नागालँडच्या विधानसभेत आरपीआय चे आमदार निवडुन येऊ शकतात मग महाराष्ट्राच्या विधानसभेत आरपी आय चे आमदार यंदा निवडून आलेच पाहिजेत.असा निर्धार करा.असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक रिपाइंचे राज्य अध्यक्ष राजा सरवदे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. त्यात ना.रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणिस गौतमभाऊ सोनावने,राज्य कार्यअध्यक्ष बाबुराव कदम,भुपेश थुलकर,युवक आघाडीचे पप्पु कागदे,महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चंद्रकाता सोनकांबळे,मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,दयाळ बहादुरे,अण्णा रोकडे,अॅड.आशाताई लंके आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सर्व मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतिचा चांगला प्रचार केला.त्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले.रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दलित पँथरच्या चळवळीत कार्यकर्ता अन्याय विरुध्द पेटून ऊठत होता.तसेच आजही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पँथर सारखे आाढमक होऊन. अन्याया विरुध्द पेटून उठावे.अन्याया विरुध्द ज्यांना राग येत नाही.ती चळवळ जीवंत मानली जात नाही.अन्याया विरुध्द लढताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संघर्ष केला पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद सदस्यत्व,विधानसभा निवडणुकीत किमान 10 जागा आणि राज्य सरकारच्या मंत्री मंडळात एक मंत्री पद मिळावे अशी मागणी रिपाइं च्या बैठकीत करण्यात आली.केंद्रीय मंत्री मंडळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रिय राज्य मंत्री पद दिल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार माननारा ठराव रिपाइं च्या राज्य कार्यकारणिच्या बैठकीत मंजुर झाल्याची माहीती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनावने यांनी दिली.