ताज्या घडामोडी

रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल वर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई..!!

०२,५०,०००/- रू. किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे विमानतळ परीसरात पेट्रोलिंग करीत असताना ट्रेडनेट बिल्डींगचे टेरेसवर विमानतळ, पुणे येथे रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल मोठया आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

त्यांनतर पोलिसांनी खात्री केली असता रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल मध्ये मोठया आवाजात सांउड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने हॉटेलवर कारवाई करून ०२,५०,०००/- रू. चे ( दोन लाख पन्नासहत्तर हजार ) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली असुन हॉटेलचे चालक यांचे विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) विमानतळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री.अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, तुषार भिवरकर, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!