ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

रेशनच्या धान्यात तर लूटच; रेशन सुरू करण्यासाठी पण घेतात लाच..!

नाशिक, निर्भीड वर्तमान:- काही दिवसांपूर्वी निर्भीड वर्तमान वृत्तसेवेने बातमी प्रसारित केली होती की, वारजे येथे रेशन दुकानदार पावती न देता रेशनकार्ड धारकांचे धान्य कमी देतो म्हणून याबाबत तक्रार दाखल झाली होती दाखल तक्रारी संदर्भात अजून तरी काही कारवाई केल्याची निदर्शनात आले नाही.  दाखल तक्रारीचे २१ दिवसात निराकार होईल असे खात्यामार्फत म्हंटले आहे. आत्ता पुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी काय कारवाई करतात ? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

रेशन
रेशन

रेशन सुरू करण्यासाठी पण घेतात लाच:

आपले रेशन सुरू करण्यासाठी सिन्नर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने/ तक्रारदार यांनी वाढती महागाई बघता आपल्या हक्काचे रेशन सुरू करण्यासाठी पुरवठा विभाग तहसिल कार्यालय, सिन्नर येथे विनंती अर्ज केला होता.

पुढील कारवाईसाठी पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय, सिन्नर या कार्यालयातील खाजगी संगणक ऑपरेटर शरद रुंजा आढाव यांनी तक्रारदार यांचेकडे १,०००/-रुपयांची लाचेची मागणी केली, प्रकरणातील तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दाखल दिली होती.

रेशन
रेशन

मिळालेल्या तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी केली आणी सापळा  रचून आरोपी शरद रुंजा आढाव यांना लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांचेविरुध्द सिन्नर पोलीस ठाणे गु.र.नं. ७१/२०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रेशनचे ध्यान्य हे सरकार गरीबला आधार देण्यासाठी देते असते पण काही विकृत लाचखोर अधिकारी / कर्मचारी यांना रेशन कार्ड काढण्यापासून धान्य सुरू करण्यासाठी पैसे पाहिजेत तर काही चोर रेशन दुकानदार यांना ग्राहकांचे हक्काचे रेशन चोरून आपलाच  फायदा पाहिजे.

रेशनकार्ड धारक यांना आवाहन आहे की जर आपल्या हक्काचे धान्य कोणताही रेशनदुकानदार कमी देत असेल, आपल्याला मिळालेल्या धान्याची पावती देत नसेल तर यासंदर्भात

सार्वजनिक वितरण-तक्रार निवारण प्रणाली

निःशुल्क हेल्पलाईन क्रमांकः १८००-२२-४९५०१९६७

वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं. १४४४५

ई-मेल: helpline.mhpds@gov.in  यावर संपर्क करा व आपली तक्रार नोंदवा. तक्रार नोंदविल्यानंतर निशुल्क बातमीसाठी ९६३७७७७००३ या क्रमांकावर व्हाटस-एप करा.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!