वारजे येथील रेशन दुकांदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी
रेशन ऑनलाइन प्रणाली असली तरी रेशन चोरी करण्याची मानसिकता काही बदलत नाही
पुणे दि.18 निर्भीड वर्तमान:- रेशन विक्री प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीचा वापर सुरू केला पण वर्षणूवर्षे रेशन चोरी करण्याची मानसिकता काही बदलत नाही असेच चित्र वारजे मध्ये बघण्यास मिळत आहे.
वारजे येथील रामनगर भागातील येथे रेशन कमी देत असल्याचा प्रकार घडत असल्याचे कळाले आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांनी घडलेल्या प्रकरणाची तक्रार अन्न पुरवठा प्रशासनाला दिली आहे.
तक्रारदार यांचे या रेशन दुकानात रेशन घेतात त्यांना दर महिन्याला 10 किलो गहू तर 15 किलो तांदूळ ऑनलाइन पोर्टल वर असल्याचे दिसते परंतु रेशन दुकानदार हा 7 किलो गहू व 7 किलो तांदूळच देत आहे. या बद्दल तक्रारदार यांनी विचारण केली असता दुकानदार यांनी वरतूनच धान्य कमी आले असल्याची माहिती दिली व मी पुढच्या महिन्यात उरलेले धान्य देईल असे उत्तर देतो तर रेशनची पावतीही ग्राहकांना देत नाही.
रेशन घेत असतांना सोबत अजून खूप ग्राहक सोबत उभे होते तो सर्वानाच असे उत्तर देत असल्यामुळे तक्रारदार यांनीही गुमान मिळते ते रेशन घेतले व घरी जाऊन आपल्याला किती रेशन येत आहे हे ऑनलाइन तपासणी केली असता त्यांच्या ही निदर्शनात आले की सादर रेशन दुकानदार हा अर्धेच रेशन देत असून पावती मात्र पूर्ण धान्य दिल्याची करतो व त्यामुळे ती पावतीही ग्राहकांना देत नाही.
तक्रारदार व बाकी ग्राहकांची फसवणूक करत आहे या पूर्वीही सदर दुकानदार यांच्या विरुद्ध तक्रारी आहेत परंतु काही दिवस दुकान बंद करून पुनः गोरगरीब रामनगर येथील नागरिकांना लुटण्याचा जणू पर्वनाच सरकारने दिला असल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. अश्या फसवणूक करणाऱ्या रेशन दुकांदारचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी मध्ये केली आहे.
तरी निर्भीड वर्तमान टीम ने संबंधित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्षेत्र अधिकारी, पुणे, यांना संपर्क करून अधिक माहितीसाठी संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया अजून मिळालेली नाही.