वकीलाचे अपरहरण करुन खुन करणाऱ्या ०३ आरोपींना देंगलुर येथुन गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिनांक ३१/१२/२०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे, वय ४५ वर्षे हे त्यांचे कार्यालय बी. टी. मेमोरीयल शाळेसमोर, काळेवाडी, पुणे येथुन मिसींग झाले बाबत दि. ०१/०१/२०२२ रोजी वाकड पोलीस ठाणे येथे नातेवाईकांनी दिलेल्या माहीतीवरुन मनुष्य मिसींग तक्रार नोंद करण्यात आली होती.
पोलीस उप आयुक्त (परि. २) डॉ. श्री. काकासाहेब डोळे यांनी मनुष्य मिसींगची गांभिर्याने दखल घेत अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांचा कसोशीने शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते, सुचनांच्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकांचे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग व्यक्ती चे कार्यालयातील व कार्यालयाचे परीसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेजेस ची पहाणी केली तसेच मिसींग व्यक्तीचे नातेवाईकांकडे तपास करण्यात आला होता, तपासामधुन राजेश्वर गणपत जाधव वय ४२ वर्षे, व स्वाती राजेश्वर जाधव यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल केलेले आहे व अॅडव्होकेट श्री. शिवशंकर शिंदे व स्वाती राजेश्वर जाधव यांचेत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन राजेश्वर गणपत जाधव याचे व अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांचेत क्लेश निर्माण झालेला होता.
राजेश्वर जाघव याचा स्वभाव रागीट असल्याचे व त्यानेच अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांना पळवुन नेले असावे असा अंदाज व्यक्त करुन मिसींग दिवशी राजेश्वर जाधव याचा फोन बंद असल्याचे स्वाती राजेश्वर जाधव यांचेकडुन समजले.
देंगलुर जि.नांदेड येथील पोलीसांबरोबर समन्वय साधुन १) राजेश्वर गणपत जाधव वय ४२ वर्षे, रा २) सतिश माणिकराव इंगळे, वय २७ वर्षे, व ३) बालाजी मारुती एलनवर, वय २४ वर्षे, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता त्यांनीच अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांना त्यांचे कार्यालयात जावुन तोंडास चिकटपटटी लावुन त्यांना प्लॅस्टीक निळया ड्रममध्ये ठेवुन अशोक लेलॅन्ड टेम्पो क्र. एम.एच.१४/के.ए./८११६ यामधुन चिन्नम्मा कोरी मंदीराजवळ, जिल्हा कामारेड्डी, राज्य तेलंगणा येथे नेऊन त्यांना जिवे मारुन त्यांची मयत बॉडी जाळण्याचा प्रयत्न केल्याने मदनुर पोलीस ठाणे, तेलंगणा येथे गु.र.नं. ०२ /२०२३, भा.द.वि. कलम ३०२,२०१ अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदरचा गुन्हा वाकड पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला आहे.
वरील तिन्ही आरोपींना पिंपरी चिंचवड येथे आणुन वाकड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन त्यांना मा. न्यायालयात हजर करुन त्यांची तपासकामी १० दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असुन पुढील तपास वाकड पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. मनोजकुमार लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ – २) डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर व सहा पोलीस आयुक्त (वाकड विभाग ) श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस अंमलदार- हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाधर चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, राम मोहीते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांनी केली आहे.