वसंत राठोड व इतर अधिकारी विरोधात ठोस कारवाईच्या आश्वासनानंतर पंधराव्या दिवशी खरात यांच्या उपोषणाची सांगता
सततच्या पाठपुराव्यामुळे कृषी आयुक्त पुणे कार्यालयातून मंत्रालयात कारवाईचा प्रस्ताव सादर
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी सन 21-22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत ठिबक तुषार साहित्य मधील 77 लक्ष रुपयांच्या घोटाळ्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे विरोधात कार्यवाहीसाठी 2 ऑक्टोबर 23 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार चंद्रकांत खरात यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती त्यांच्या उपोषणाची पंधराव्या दिवशी कुंभकर्णी झोपेत असलेल्या कृषी विभागाने दखल घेतली व आयुक्त कृषी पुणे यांच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार तात्काळ या प्रकरणातील सर्व दोषी अधिकारी कर्मचारी यांचे विरोधत शासन नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर चंद्रकांत खरात यांनी पंधराव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे.
याबाबत सविस्तर असे की सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी सन 2021ते 22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेतील साहित्य वाटप मध्ये वितरकासोबत आर्थिक हितसंबंध जोपासत 77 लक्ष रुपयांचा घोटाळा केल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्यानंतर राठोड यांनी “मी तो नव्हेच” चा आव आणून त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवून मोकळे झाले मात्र या प्रकरणात तेही दोषी असल्याने त्यांचे विरोधात नियमानुसार कारवाईसाठी चंद्रकांत खरात यांनी कृषी विभागाचे संबंधित विभागाकडे रीतसर पाठपुराव्यासह तक्रार करून या प्रकरणातील सर्वच दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली मात्र शासनाने वसंत राठोड यांचे विरोधात केवळ दोषारोप पत्र एक ते चार बजावले यानंतर चंद्रकांत खरात यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक 2 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली त्यामुळे राठोड यांना पाठीशी घालणारे कृषी आयुक्त हे अडचणीत आले, राठोड व इतर कर्मचारी यांचे विरोधात कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडे सादर केल्याने व उपोषणकर्त्यास संबंधित विभागाचे उपसचिव यांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने खरात यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असे खरात यांनी बोलताना सांगितले.