वाहनचोरी करणा-या सराईत चोरास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद..!!
चोरीच्या एकुण 03 दुचाकी केल्या जप्त..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक, जयवंत जाधव, पोउनि भोसले तसेच पोलीस अंमलदार असे वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार निलकंठ राठोड व विष्णु सुतार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक व्यक्ती काळे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल क्र. एमएच / १२ / एचएस / ८३१३ ही मारुती मंदिरासमोरील रोडवर, शिंदे छत्रीजवळ, वानवडी येथे थांबलेला असुन तो त्याचेकडील मोटार सायकल ही कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
बातमीचे अनुशंगाने नमुद ठिकाणी सापळा रचुन बातमीतील सर्फराज ऊर्फ बॉब इकबाल मोमीन, वय-२३ वर्षे, याला मोटार सायकलसह जागीच पकडले, व त्यावेळी त्याचेकडे असलेल्या मोटार सायकलबाबत त्याचेकडे तपास केला असता, मोटार सायकल ही त्याने पंधरा दिवसांपुर्वी गल्ली नं. २६ / ए,नुर मज्जीद जवळ, सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर येथुन चोरी केलेली असलेबाबत सांगीतले. सदरबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५२३/२०२२, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीकडुन मोटार सायकल जप्त केली असुन, त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याने चोरी केलेल्या आणखी दोन मोटार सायकल स्वखुशीने काढुन दिलेल्या आहेत. तसेच त्याचेकडुन एकुण १,२०,०००/- रु. किंच्या एकुण ०३ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असुन, त्यासंदर्भात दाखल असलेले वाहन चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात वानवडी पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख व मा.सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, श्रीमती पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक, गुन्हे, संदिप शिवले व तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव, पोलीस उप-निरिक्षक, अजय भोसले, पो. अंमलदार, अमजद पठाण, संतोष काळे, विनोद भंडलकर, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड व विष्णु सुतार यांनी केली आहे.