विमानाने पुण्यामध्ये येवुन महागडे फोन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद..!!
तब्बल ३० लाख रुपयांचे मोबाईल फोन केले जप्त..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड येथे दिनांक २४/०२/२०२३ ते दिनांक २६/०२/२०२३ दरम्यान व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या आयोजित कार्यक्रमामध्ये मोबाईल चोरी होत असल्याबाबतच्या तक्रारी विमानतळ पोलीस प्राप्त होत होत्या.
विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र ढावरे व तपास पथकातील स्टाफ असे सदर ठिकाणी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सपोफो अविनाश शेवाळे यांना एक संशयित व्यक्ती दिसला त्यास थांबण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जावु लागला. त्यावेळी पोलीस अंमलदार थोपटे व बर्डे यांनी असद गुलजार महंमद रा. दिल्ली याचा पाठलाग करुन त्यास पकडले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने आम्ही व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या कार्यक्रमामध्ये मोबाईल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथुन आलो असुन माझे साथीदार हे मिलन हॉटेल, पुणे स्टेशन येथे आहेत असे सांगितले.
लागलीच वपोनि श्री. विलास सोंडे यांना सदरची बातमी कळवुन तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी मिलन हॉटेल पुणे स्टेशन येथे जावुन चार इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतले इसम नामे १) असद गुलजार महंमद वय ३२ वर्षे रा २) निजाम बाबु कुरेशी वय ३५ वर्षे ३) शाहबाज भोले खान वय २६ वर्षे ४) राहुल लीलीधर कंगाले वय ३० उत्तरप्रदेश ५) नदीम इब्राहिम मलीक ४० वर्षे रा. दिल्ली अशी आहेत तर यांचेकडुन एकुण २८,४०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ३९ महागडे मोबाईल फोन जप्त केलेले आहेत.
तसेच या कार्यक्रमामध्ये दिनांक २४/०२/२०२३ रोजी मोबाईल फोन चोरी करणारा इसम प्रशांत के. कुमार, रा. कर्नाटक यास सुध्दा विमानतळ पोलीस स्टेशन तपास पथकाने ताब्यात घेतले असुन त्याचेकडुन एकुण १,८७,०००/- रुपये किंमतीचे एकुण ५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत सदर बाबत गु.र.नं. १०५/२०२३ भादंविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. असे एकुण ३०,२७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. रविंद्र ढावरे करीत आहेत..
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता माळी, पोलीस उप निरीक्षक श्री. रविंद्र ढावरे, समु चौधरी, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.