वेअर हाऊसमध्ये चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना ५,४९,२७८/- रुपये किंमतीचा मुद्देमालासह अटक..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- दिनांक ०६/०४/२०२३ रोजी पाहटे ०२.०० वा ते सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान मौजे कुरूळी गावाचे हद्दीत असलेल्या आर वी सी सप्लाय चेन सोल्यूशन प्रा. लि. कंपनीमध्ये कुरूळी ता. खेड येथील कंपनीमधील वेअर हाऊसचे पाठीमागील बाजूचे पत्र्याचे शेड उचकटून कोणी तरी अज्ञात चोरटयाने ५,१९,२७८/- किंमतीचे फोर्थ, फिफ्थ सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड कंपनीचा एल ई डी टिव्ही चोरुन घेऊन गेलेले होते. याबाबत गुन्हा महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. चोरीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत तपास पथकास आदेशित केलेले होते.
पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणा व्दारे माहिती प्राप्त झाली की, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला माल हा आलम युसूफ मणियार, वय-३२ वर्षे व गणेश रामबाबू निशाद, वय-२२ वर्षे, यांनी चोरून नेलेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन गुन्हयात चोरीस गेलेला ५,४९,२७८/- किंमतीचे फोर्थ, फिफ्थ सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड कंपनीचा एल ई डी टिव्ही व मोटार सायकल जप्त करण्यात आले आहेत.
आलम युसूफ मणियार, वय-३२ वर्षे, धंदा- भंगार व्यवसाय, रा. कुदळवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव- जमनापूर, ता. उचाहार, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश यावर पिंपरी पोलीस स्टेशन येथील पाच गुन्हे, भोसरी पोलीस स्टेशन मध्ये एक, पौड पोलीस स्टेशन येथे एक, महाळुंगे पोलीस स्टेशन येथे एक, चाकण पोलीस स्टेशन येथे तीन असे एकुण 11 गुन्हे यापूर्वी दाखल आहे.
कंपनीना आवाहन
याद्वारे पोलीस प्रशासनाने सर्वांना आवाहन केले आहे की, कंपनी परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड नेमावेत तसेच सी सी टि व्हि कॅमेरे व लाईट लावाव्यात तसेच कंपनी परिसरामध्ये संशयित इसम फिरताना मिळुन आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा त्यामुळे कंपनीमधील चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त श्री विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंत बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. किशोर पाटील, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, सपोफी थेऊरकर पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल वडेकर, मपोना जमदाडे पोकॉ/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड यांनी केली आहे.
तर पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.