शालेय शिक्षणमंत्री मा.दिपक केसरकर यांच्या हस्ते झाले निर्भीड वर्तमान साप्ताहिकाचे प्रकाशन
मुंबई दि. 17 निर्भीड वर्तमान:- शालेय शिक्षण मंत्री मा.दिपक केसरकर यांच्या हस्ते निर्भीड वर्तमान या साप्ताहिकाचे प्रकाशन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्रतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे.
बालभवन, नरिमन पॉईंट येथे कॅबिनेट मंत्री मा. दिपक केसरकर साहेब यांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन करण्यात आले आहे. या प्रकाशन वेळी महाराष्ट्रातील सर्व भागातील पत्रकार बांधवही मोठ्यासंख्येने उपस्तित होते या प्रकाशन कार्यक्रमासाठी विषेश स्वतः स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामकृष्ण नेरकर साहेब व महाराष्ट्र अध्यक्ष किरण बागुल साहेब यांची विषेश उपस्तिती लाभली आहे सोबत मुंबई प्रदेश अध्यक्ष महेश सावंत, कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व का.संपादक निर्भीड वर्तमान श्रीकांत दारोळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव जयंत मगरे, पुणे शहर अध्यक्ष तथा स्विफ्टएनलिफ्ट मिडीया कंपनीचे संचालक निलेश साबे, पुणे शहर उपाध्यक्ष तथा सुयोग टाईम्सचे सहसंपादक अतूल गायकवाड आदी मान्यवर व इतर सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षां पासुन डिजिटल माध्यमातून समाजामधील प्रत्येक छोटे- मोठे, चांगली-वाईट घडणाऱ्या घडामोडी महाराष्ट्रातील नागरिकांसमोर नावाप्रमाणे निर्भीड पणे मांडत आहे याबद्दल मंत्रीमहोदय मा. केसरकर साहेब यांनी निर्भीड वर्तमानच्या संपादिका अश्विनी दारोळे यांच्या सोबत संपूर्ण टिमचे अभिनंदन केले व यापुढे कोणत्याही पद्धतीचा दबावाखाली व पक्षपात न करता पत्रकारितेचे पावित्र्य राखून निर्भीडपणे बातम्या जगासमोर मांडत रहाल या अपेक्षेसहित पुढील वाटचाली करीता अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.