क्राइमताज्या घडामोडीपुणे

शिरगाव व तळेगाव हद्दीतील १० लाखाचे गावठी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त..!!

अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपूनछपुन होणारी गावठी हातभट्टी विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केलेले होते.

त्यानुसार दि. २१/०४/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पोलीस शिपाई मितेश यादव यांना मिळालेल्या बातमीवरुन शिरगाव येथे पवना नदीच्या कडेला छापा टाकुन दोन गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची चालु भट्टी व मातीमध्ये मोठे टाकी सारखे तीन खड्डे तयार करुन त्यामध्ये ताडपत्री ठेवलेली ५,००० लिटर मापाचे दोन व १०००० मापाचा एक खड्डा त्या खड्ड्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे २०,००० लिटर रसायन (कच्चा माल ) असा एकुण १०,००,०००/- रु. किं.चा प्रोव्हिबिशन माल गावठी दारु तयार करण्यासाठी ठेवलेला मिळुन आला आहे. तसेच एकुण १०,५००/- रु. किं.ची ३५ लिटर मापाचे गावठी हातभट्टी तयार दारुचे भरलेले ०३ कॅण्ड जप्त करण्यात आले आहे. या दारूच्या भट्ट्या ह्या ज्योती इश्वर राजपुत रा. कंजारभटवस्ती गहुंजे रोड मु.पो. शिरगाव ता. मावळ जि.पुणे व आश्विनी राहुल मनावत वय ३० वर्षे रा. कंजारभटवस्ती गहुंजे रोड मु. पो. शिरगाव ता. मावळ जि.पुणे यांची असल्याची माहीती मिळाल्याने तिचे विरुध्द शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत टि. जी. एच. डोळयाचे हॉस्पिटल समोर झाडाचे आडोशाला प्रशांत अरुण दुबे, याच्या ताब्यातुन एकुण ५,३००/- रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारुचा प्रोव्हि. माल जप्त करुन त्याच्या विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

वरील कारवाईमध्ये एकुण २०,००० लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायन व १५८ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु व दारुच्या भट्टी साठी लागणारे भांडे असा एकुण १०,१५,८००/-रु. किं.चा प्रोव्हिबिशन माल जप्त करण्यात आला आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!