शिवराज्यभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचा झाले अनावरण
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे समारोप पर्व, ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राजभवनातील दरबार हॉल येथे ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ आणि ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची होती. या राज्याने स्वातंत्र्य लढ्याला नेतृत्व दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहील – राज्यपाल रमेश बैस
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे केले. स्वातंत्र्याचे अमृत मिळविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यांना अभिवादन करण्यासाठी माझीमातीमाझादेश हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातूनच स्वातंत्र्याचा हुंकार उठला होता. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गावरून राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारत देश सुजलाम् सुफलाम् होता. या देशाचे आकर्षण जगाला होते. त्यातूनच भारतावर आक्रमणे झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला आणखी सुजलाम् सुफलाम् करुया – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, टपाल विभागाचे पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गॅझेटर विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील महाराष्ट्रातील समाज सुधारक, विचार वर्धक आणि हिंदी भाषेतील स्वातंत्र्य संग्राम मे महाराष्ट्र का योगदान या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कलावंतांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला.