संजय राऊत यांना वंचित बहुजन आघाडीचा घरचा आहेर, तुम्हाला अकोलाची जागा लढवायाची असेल तर खुशाल लढवा
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांचे स्पष्टीकरण, सोबत विचारले प्रश्न
मुंबई दि. ८ निर्भीड वर्तमान:- शिवसेना ( उ. बा. ठा. ) चे नेते, संजय राऊत यांना घरचाच आहेर त्यांचा मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. तुम्हाला अकोला येथील जागा लढवायाची असेल तर खुशाल लढवा वंचित बहुजन आघाडीची काही हरकत नसणार आहे असे सांगत वंचित बहुजन आघाडीची मुख्य प्रवृत्ते सिद्धार्थ मोकळे यांनी कॉँग्रेस तुम्हाला सोबत घेणार आहे का ? असा सवाल विचारला आहे.
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्याला बगल देत संजय राऊत ही अकोला – अकोला करत बसल्याचे माध्यमामधून दिसत असल्याचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांचा आरोप आहे.
काय म्हणाले मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे
जर वंचित बहुजन आघाडी आणी शिवसेना यांची युती आहे.आपण सोबत आहोत, आपला २४-२४ चा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळे हव तर तुम्हाला वाटत असेल तर स्वतः संजय राऊत यांनी अकोल्याची जागा लढवावी त्याला आमची काही हरकत नाही. मात्र शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाचं काही ठरलय का ? ठरलं नसेल तर का ठरत नाही ? आणि काँग्रेस तूम्हाला सोबत घेणार आहे का ? संजय राऊत यांनी या बाबत स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे व उत्तर दिले पाहिजे असे सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत.