साताऱ्याच्या भीमाई भूमीत माता रमाईची रथातून भव्य मिरवणूक !
सातारा, निर्भीड वर्तमान :- माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये कराडहून आलेल्या रथाचीच खुमासदार चर्चा चालू आहे. रथात माता रमाई यांच्या प्रतिमा येथील भूमीत दिमाखात झळकत होती. त्यामुळे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या.
कराडपासून रथातून निघालेल्या मिरवणुक डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ विसावली. दरम्यान,जिल्हा पक्ष कार्यालयापासून निघालेल्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी जयजयकाराच्या घोषणा दिल्या. पुतळ्यापासून रथाच्या पुढे मागे बाईक रॅलीची वर्दळ शहरातून हायवेमार्गे कराडला रवाना झाली. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. पुतळ्याजवळ असणाऱ्या सभामंडपात माणिक भीमसैनिक, व कराडच्या शिलेदारांनी मधुर आवाजात गीते गाऊन अभिवादन केले.समारोपप्रसंगी माता रमाईच्या जीवनचरित्रावर अमित मोरे (महाबळेश्वर) यांच्यासह अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली.
रिपाईचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले की, “रमाईसाठी बाबासाहेबांनी दीक्षाभूमीत पंढरी निर्माण केली.रमाई आपल्यासाठी झिजली.बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. त्यामुळे बहुजनांनी जाणीवतेचे भाषण ठेवुन चळवळ चालवली पाहिजे. संविधान आहेच तरीपण विरोधक वेगळ्याच विचाराने वाटचाल करीत आहेत.त्यामुळे स्वस्थ बसून चालणार नाही.”
माणिक आढाव म्हणाले,”सर्व संघटनेत प्रभावी काम दादा ओव्हाळ करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली माता रमाईच्या जयंतीचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला आहे.” असे सांगून त्यांनी इतर संघटनांनी भरीव असा कार्यक्रम घेतला नसल्याचा हल्लाबोल केला.कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मदनबापू खंकाळ म्हणाले, “चळवळीसह समाजकारण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे योगदान असले पाहिजे.फक्त स्वार्थ हेतूने काम करीत असाल तर पदावरून दूर व्हा.” असा सज्जड दम पक्षासाठी देऊन आगामी काळात सुधारणा आढळुन आल्या पाहिजेत.असाही सल्ला अनेक उदाहरणाद्वारे बापूंनी दिला.
सदरच्या कार्यक्रमास कराड तालुका वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आबा लोंढे,उपाध्यक्ष अमर कांबळे, कराड शहराध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष दुपटे, युवा सरचिटणीस राज चव्हाण, तालुकाध्यक्ष मुकुंद माने व उत्तरचे महेंद्र गोतपगार आदी कराड तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येनी आले होते.याशिवाय, सातारा तालुकाध्यक्ष राकेश जाधव,शहरातील पदाधिकारी – कार्यकर्ते,कामगार युनियनचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय पवार,दीपक गाडे, जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते,पत्रकार व महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.