ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिव्य कला मेळ्याच्या समारोप समारंभाचे मुंबईत आयोजन

16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून या दहा दिवसीय मेळाव्याचे झाले आयोजन

दिव्यांग व्यक्तींना, दिव्य कला मेळ्याच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य दाखवण्याची आणि त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची मिळाली संधी

 

By Vartaman Times:- मुंबईत बीकेसी मैदानावर 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दिव्य कला मेळा 2023 ची काल सांगता झाली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  यावेळी बोलताना आठवले म्हणाले 2011 च्या जनगणनेनुसार आपल्या देशात दिव्यांग व्यक्तींची  लोकसंख्या दोन कोटी 68 लाख इतकी आहे. यापुढच्या जनगणनेमध्ये या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.  आपले मंत्रालय दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.  अशाच प्रकारचे मेळे दिल्ली आणि गुवाहाटी मध्ये आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये विविध राज्यातल्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.  या मेळाव्यांच्या माध्यमातून दिव्यांग उद्योजकांना आपल्या बाजारपेठेचा विस्तार करता येईल अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले यांनी सांगितले. मुंबईत आयोजित करण्यात आलेला अशा प्रकारचा हा तिसरा मेळा आहे. या पुढचा मेळा 11 मार्च 2023 पासून भोपाळमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे मेळे प्रत्येक राज्यात आयोजित करण्याचा आमच्या मंत्रालयाचा विचार आहे.  सर्वांनी पुढे यावं आणि या मेळाव्यांना भेट द्यावी आणि दिव्यांग उद्योजकांना त्यांची उत्पादने खरेदी करून प्रोत्साहन द्यावे असे मी सर्वांना आवाहन करतो,असे आठवले म्हणाले.

दिव्यांग उद्योजकांसाठी पहिल्यांदाच इतक्या व्यापक स्तरावरील दिव्य कला मेळा हे प्रदर्शन/ मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून आलेले सुमारे 150 दिव्यांग कारागीर आणि उद्योजक सहभागी झाले होते. आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने आयोजित केलेल्या या दहा दिवसांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी आपली उत्पादने मांडली होती. दिव्य कला मेळ्यामध्ये घरगुती सजावट आणि जीवनशैलीशी संबंधित वस्तू तसेच वस्त्र प्रावरणे, स्टेशनरी आणि पर्यावरण स्नेही उत्पादने, पॅकबंद खाद्यपदार्थ आणि सेंद्रीय उत्पादने, खेळणी आणि भेटवस्तू, वैयक्तिक आभूषण सामग्री, क्लच बॅग इत्यादी वस्तू मांडण्यात आल्या होत्या.

दिव्य कला मेळ्यामुळे दिव्यांग कलाकारांचे विविध समूह आणि इतर व्यावसायिक कलावंतांना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध झाली आणि माग, एम्ब्रॉयडरी मुक्त हाताने बनवलेली पेंटिंग्स, शोभेच्या वस्तू वीट ग्रास पेंटिंग इत्यादीचे उपस्थित अभ्यागतांसमोर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करता आले. या मेळाव्यात महिला उद्योजक कलाकारांचा अतिशय उत्साही सहभाग  होता. एकूण 27 महिला उद्योजकांव्यतिरिक्त अनेक महिला कलाकार यामध्ये सहभागी झाल्या होत्या. दिव्यांगांमध्ये असलेली प्रतिभा प्रदर्शित करण्याचा एक मंच या मेळाव्याच्या निमित्ताने उपलब्ध झाला होता. काही दिव्यांग सहभागींनी व्यासपीठावर देखील सादरीकरण केले. दिव्यांगाना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था देखील या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.

   

एन एच एफ डी सी, के व्ही आय सी, डेव्हलपमेंट कमिशनर(हस्तकला) आणि अनेक स्वंयसेवी संस्थांच्या स्टार्ट अप्सनी संयुक्तपणे दिव्यांगाच्या फायद्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले होते. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेतः

  1. संयुक्तपणे व्यवसाय नियोजन आणि प्रकल्प अहवाल यावर चर्चा
  2. नव्या व्यवसाय संधी आणि बाजारात ओळख निर्माण करणे,
  3. ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या माध्यमातून विपणन

या व्यतिरिक्त मूल्यमापन आणि कारीगर कार्डच्या नोंदणीसाठी खरेदीदार विक्रेता भेटी आणि उत्पादन विकास आणि पुरस्कारासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन यासाठी सहभागींची निवड करण्यात आली.  या मेळाव्याला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले.  या मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींनी एकूण 80 लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा व्यवसाय केला.  दिव्यांग व्यक्तींना अनेक कंपन्यांकडून खरेदीची हमीदेखील देण्यात आली. या मेळाव्याला स्थानिक आणि परदेशी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिली.  या मेळाव्यात अभ्यागतांनी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.  विविध सरकारी आणि बिगर सरकारी संघटनांनी हा मेळावा यशस्वी करण्यामध्ये उत्तम भूमिका बजावली. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्यतिरिक्त या मेळाव्याला समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

 

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!