क्राइमताज्या घडामोडीपुणे

सामाजिक सुरक्षा विभागने केली अवैध्य हुक्का पार्लरवर छापा कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- एन.आय.बि.एम. कोंढवा हद्दीत इडीपी फॅमिली रेस्टारंट, क्लाउड ९ एरीया, रहेजा व्हिस्टा सोसायटीजवळ हॉटेलमध्ये अवैध हुक्का बार चालु असलेबाबत गोपनिय बातमीदार मार्फतीने सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी यांना खात्रीशीर बातमी मिळाली होती.

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता हॉटेल मध्ये हुक्कापॉट ठेवुन तंबाखुजन्य हुक्का धुम्रपान करताना मिळुन आल्याने हॉटेल मालक, मॅनेजर, हुक्का बनविणारा व सर्व्ह करणारा वेटर असे एकुण ४ आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळावरून ४५,५००/- रू. कि. चा मुद्देमाल त्यामध्ये वेगवेगळया कंपनीचे तंबाखुजन्य हुक्काचे फ्लेवर व हुक्कयाचे १५ पॉट तसेच साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं ४९३ / २०२३ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-२०१८ चे कलम ४ अ, २१-अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनच्या मार्फतीने करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, अमित जमदाडे, या पथकाने यशस्वी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!