सामाजिक सुरक्षा विभागाकडून लॉजवर छापा टाकुन ३ पिडीत मुलींची सुटका..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर यांना गोपनिय माहिती मिळाली की,एस. के. रेसिडेन्सी लॉज, लक्ष्मी कॉलनी, सोलापुर रोड, हडपसर, पुणे येथे मुलींना वेश्या व्यवसाया साठी ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.
मिळालेला माहितीनुसार एस. के. रेसिडेन्सी लॉज येथे सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवुन खात्री केली या लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून एस. के. रेसिडेन्सी लॉज येथून एकुण ०३ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली असुन, त्यांना संरक्षणकामी रेस्क्यु फाउंडेशन, हडपसर पुणे येथे ठेवण्यात आले आहे.
सदर प्रकरणी ०१ आरोपीला अटक करण्यात आले असुन व ०१ पाहिजे आरोपी असे दोन आरोपी विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १६२३ / २०२२, भादविक ३७०, ३४, सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, श्री श्रीनिवास घाडगे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, (अति. कार्यभार), श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.