ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम पत्रकारीताच करू शकते -डॉ.गणेश जोशी

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले जाते. वृत्तपत्राच्या आगमनामुळेच देशाला मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचे काम करण्यात आले. पत्रकारीता क्षेत्र हे आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विखुरले जात आहे. सोबतच त्याच्या जबाबदार्‍या देखील प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. या क्षेत्राने सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले असल्याचे प्रतिपादन एमजीएम पत्रकारीता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी केले. पूर्णा येथे आयोजित एका माध्यमाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष संतोष एकलारे हे होते तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य मोहनराव मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मार्गदर्शक पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन युथ पँथरचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.जोशी म्हणाले की, पत्रकारीतेच्या माध्यमातून सत्य परिस्थिती आणण्याचे काम पत्रकारांनी करणे आवश्यक आहे. सोबतच दिवसेंदिवस पित्त पत्रकारीतेमुळे जनतेची विश्‍वासहार्यता कमी होऊ लागली आहे. ही विश्‍वासहार्यता वाढविण्यासाठी पत्रकारीता क्षेत्रात काम करणार्‍यांनी योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे तरच आपण सर्वसामान्यांना न्याय देवू शकू.

या क्षेत्रामुळेच शासन व प्रशासनावर अंकुश असल्याचे सांगत पत्रकारीता क्षेत्रात काम करणार्‍यांनी सत्य परिस्थिती जाणूनच बातमी प्रकाशीत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर पूर्णा शहराला खर्‍या अर्थाने प्रदिप ननावरे यांच्यामुळे न्याय मिळत आहे. सत्य परिस्थिती समोर आणण्याचे काम प्रदिपने केले असून पत्रकारीता क्षेत्रावर जनतेची विश्‍वासहार्यता या कार्यामुळे वाढत जात असल्याचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी सांगितले.

आज खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रामध्ये पहावयास मिळत आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते मग खरी परिस्थिती तपासणे व योग्य बातमी देणे हे वृत्तपत्राचे काम नाही का ? असा सवाल बहुजन युथ पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी उपस्थित केला. पुढे बोलतांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारीतेवर प्रकाश टाकत पत्रकारीता हे किती मोठे क्षेत्र आहे या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास जनतेला न्याय मिळेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी प्राचार्य मोहन मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष एकलारे यांनी देखील आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी आशिष वाकोडे, संदीप ढगे, सोमनाथ सोलो, राजकुमार सुर्यवंशी, शेख सोहेल, रवि गायकवाड, विशाल कांबळे, शिवहार सोनटक्के, राजू नारायणकर, नागेश एंगडे, शेख नशिर, दिपक रनवीर, मो.शफीक आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमा प्रसंगी ख्यातनाम गायीका भाग्यश्री इंगळे यांचाही ‘मला तुझ्या रक्तातला भिम पाहू दे’ या भिमगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आयोजक प्रदिप ननावरे, मनोज भुजबळ, प्रेम गायकवाड, शे.समी, अभिनय भारत, दिलीप काळे आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!