सावधान : जलकुंभी वनस्पती घुसखोरी च्या तयारीत…!
पुणे, निर्भीड वर्तमान:- शहरात ठीक ठिकाणी टोपल्यांमध्ये हिरव्या देठांची वनस्पती ट्युलिप, सदाबहार, बारामासी, ह्या नावानी लोकांनां फसवून सर्रास विकण्याचा प्रयत्न सुरु आहे.
ट्युलिप, सदाबहार, बारामासी, हे दुसरे तिसरे काही नसून जलकुंभी ही वनस्पती आहे. जलकुंभी हिचे शास्त्रीय नाव Echhornia crassipes असून ती Pontedriaceae ह्या कुळातील वनस्पती आहे, तीला Water hyacinth ह्या नावाने जगभरात ओळखल्या जाते. जलकुंभी ही आपल्या देशात बाहेरून आलेली आक्रमक वनस्पती आहे जलाशयाच्या पृष्टभागावर वेगाने वाढणारी ही वनस्पती काही दिवसात संपूर्ण जलाशय वेढून घेते आणि त्या जलाशयात असणाऱ्या इतर वनस्पतीला नष्ट करण्यास कारणीभूत ठरते. जलकुंभी हे नदी, तलाव, छत्री तलाव सारख्या जलाशयांना धोक्याची घंटाच आहे.
१०० ते ५० रुपयांना ३ रोपे ह्या दराने ट्युलिप च्या नावावर ह्याची विक्री होत आहे, ट्युलिप ही थंड हवामान असणाऱ्या प्रदेशात वाढणारी आणि आकर्षक विविधरंगी फुले असणारी वनस्पती आहे. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर जलकुंभी घरा घरात पोहचली तर ह्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील कारण पाण्यावर वाढणारी ही वनस्पती डासांना आमंत्रण देते शहरात तसेच जिल्ह्यात डेंगू च प्रादुर्भाव सुरु आहे.सर्व नागरिकांना आव्हान, ह्या फसवणुकीला बळी न पळता आपला खिसा, स्वतः चे आरोग्य सांभाळा.