पुणेराजकीय

रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे नेते भाजपा युतीसोबत नाराज..!!

साहेब, मी नम्रपणे या पक्षातून बाहेर पडुन फक्त एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करेल- डाँ.सिध्दार्थ धेंडे, माजी उपमहापौर

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- रिपब्लिकन पक्षाचे नेते तसेच पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डाँ.सिध्दार्थ धेंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेब यांना पत्र लिहून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच महात्मा फुले डाँ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या संस्था काढल्या त्या संस्था भिक मागुन काढल्या असे आक्षेपार्य विधान केले होते. त्याचा निषेध म्हणुन पिंपरी चिंचवड येथील काही आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली , हे करणे चुक आहे. पण ती एक भावनिक प्रतिक्रिया होती. त्यानंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवर चुकीचे कलमृ लावली. 307 . 120 ब ही कलमे काढुन टाकावी.

तसेच जर भाजपचे नेते वारंवार फुले शाहु आंबेडकर यांचा अपमान करणारी विधाने करत आहे. रिपब्लिकन पक्ष हा समतेच्या विचारावर आहे.आणि राजकीय फायद्यापेक्षा आपण बाबासाहेबांच्या विचारांनुसार काम करतो, त्यामुळे भाजप बरोबर युती असुन ही भाजप चे वरिष्ठ नेते जर नेहमीच बाबासाहेबांचा अपमान करणारी विधाने करत असेल तर. मला अशा युतीबरोबर काम करण्यास अवघड होत आहे. त्यामुळे जर भिमसैनिकावरील चुकीचे गुन्हे मागे घ्यावे आणि भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल चुकीची विधाने करु नये. अन्थाय मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणुन काम करेन आणि मी पक्षाचा राजीनामा देतो असे पत्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पाठवले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!