पुणे

सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणारे मोरक्याच्या बीड येथुन आवळल्या मुसक्या..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिनांक २८/१२/२०२२ रोजी रात्रौ सिंहगड कॅम्पस मध्ये तक्रारदार हा त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले असताना, आरोपी करण अर्जुन दळवी व त्याचा साथीदार यांनी परिसर दहशत पसरविण्यासाठी हातात लोखंडी कोयता घेवून, कोयता हवेत फिरवुन येणारे-जाणारे लोकांना धाक दाखवत होते,काही दुकानांचे शटरवर वार करुन, रोडचे कडेला असलेल्या गाडयांवर कोयता मारुन दहशत निर्माण करत होते त्यामुळे तेथील लोकांनी दुकाने बंद करुन सैरावैरे पळुन गेली.

त्यावेळी आरोपी यांनी तेथील एक स्टुल तकारदार यांचा मित्र तन्मय ठोंबरे याचे पाठीवर फेकुन मारला. तसेच फिर्यादी यांचे मानेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन जखमी केले होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.८७७/२०२२, भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ४२७, ३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियक कलम ३७ (१) (३) १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५, क्रिमीनल अमेंन्टमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी करण अर्जुन दळवी याचा भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार, हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे यांना आरोपी करण अर्जुन दळवी हा बीड येथे लपुन बसला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप- निरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांनी आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. त्यांनी बीड येथे जावुन आरोपी करण अर्जुन दळवी, वय २१ वर्षे, याचा शोध घेतला व त्यास साठे चौक, बीड येथून ताब्यात घेवुन अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्रीमती. सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले व राहुल तांबे यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!