ताज्या घडामोडी

सोलापुर येथे भारतीय स्वातंत्र्याचे 1857 ते 1947 कालखंडातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन..!!

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित पाच दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सोलापूर येथे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित दिनांक 19 ते 23 जानेवारी 2023 पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि केंद्र शासनाचे 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर होम मैदान येथील होम कट्ट्या जवळील जागेत पाच दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनमध्ये 1857 ते 1947 पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, सोलापुरातील चार हुतात्मे, आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, उज्जवला योजना या सारख्या विविध विकास योजनांची छायाचित्र व मजकूर सहित माहिती असणार आहे. वी आर तंत्रज्ञानाचा माध्यमातून साबरमती आश्रम आणि संपूर्ण प्रदर्शन बघता येणार आहे. खास विद्यार्थ्यासाठी आजादी का क्यूस्ट ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः प्रदर्शनमध्ये मोठ्या मोठ्या एल ई डी स्क्रीनवरून शासकीय उपक्रम व योजनांची माहिती नागरिकांना बघता येणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार मा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते आज सायंकाळी 06:30 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी आमदार श्री विजयकुमार देशमुख, आमदार श्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त डॉ राजेंद्र माने, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, आदि उपस्थित राहणार आहेत हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 09 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

यात्रेच्या निमिताने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यातून येणा-या भविकांना स्वातंत्र्यलढ्याच्या माहिती, केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!