वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- साईबाबा मंदिर वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या <span;>पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.जसवीन कौर छाबडा (Naturopathist) यांना मा.हरिश्चंद्र आण्णा दांगट पाटील माजी नगरसेवक यांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन नवदुर्गा पुरस्कार 2022 सन्मानित केले.तसेच नवनाथ महाराज लिमण यांनी किर्तनरुपी सेवा केली.
महिला अध्यक्षा.सौ.जसवीन कौर छाबडा (Naturopathist) यांचे व महिलांसाठी समाजामध्ये मोठे कार्य सातत्याने सुरू असते. महिलांसाठी व समाजामध्ये कोठेही अन्याय अत्याचाराचा विरूध्द ताकदीने ऊभे राहणारे असे सौ. छाबडा यांचे नेतृत्व आहे. सौ.छाबडा यांना नवदुर्गा पुरस्कार 2022 हे त्यांच्या कामाची पोचपावतीच आहे असे म्हटले तरी अयोग्य होणार नाही या मिळालेल्या पुरस्कार साठी सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवरांकडून सौ. छाबरा यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
या वेळी पोलीस उपनिरक्षक, श्रीकांत जोशी साहेब (साई सेवेकरी) ,मा.राजेेंद्र वाघ , खडकवासला नगरसेविका सौ.अनिता ताई इंगळे,मा.केतन शिदे, मा.रामचंद्र पोळेकर.श् देवेंद्र शूर राजेंद्र पवार इ मान्यवर उपस्थित होते.