ताज्या घडामोडीपुणे

स्पा सेंटरवर छापा टाकुन ०३ परदेशी व १ भारतीय पिडीत मुलींची सामाजिक सुरक्षा विभागाकडून सुटका..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लाना स्पर्श स्पा, गुलमोहर अर्चिड बिल्डींग, पहिला मजला, प्लॅट नं ०६, लुलानगर, कोंढवा पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने तात्काळ सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

स्पा मालक व मॅनेजर यांचे विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं २० / २०२३ भादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता कोंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री. रितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण, या पथकाने यशस्वी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!