हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणारी महिलेस गुन्हे शाखा युनिट-४ ने केले जेरबंद..!!
वर्तमान टाइम्स | वृत्तसेवा :- एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबरजी-२९, लोअर ग्राऊन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकानातुन दागिने खरेदीच्या बहाण्याने फिर्यादी यनजर चुकवुन २,८२,७५०/- रू किंमतीचे एक सोन्याचे ब्रेसलेट चोरुन नेलेबाबत विमानतळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला होता.
दाखल गुन्हयाचा तपास करताना युनिट-४ कडील पथक यांनी विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत संशयीत महिलेचा शोध घेत वडगांव शेरी येथील विठ्ठलनगर येथे आले असताना, “फिनिक्स मॉल मध्ये चोरी करुन काळया रंगाची स्कुटरवरुन पळुन गेलेली संशईत महिला ही अनुग्रह सोसायटी येथे रहात आहे.” अशी खात्रीशिर बातमी पोलिसांना मिळाली.
प्राप्त बातमीप्रमाणे युनिट-४ कडील पथक अनुग्रह सोसायटी, वडगांव शेरी, या सोसायटीचे पार्किंग मध्ये गेले असता काळया रंगाची स्कुटर पार्क केलेली दिसली. त्याबाबत अधिक माहिती घेता सोसायटीतील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं. ११ मध्ये राहणारी महिलेची असल्याचे समजले. त्याप्रमाणे फ्लॅट मध्ये जाऊन खात्री करता, फ्लॅट मध्ये राहणा-या अनु वेदप्रकाश शर्मा, वय-३० वर्षे हिला महिला पोलीस अंमलदार, वैशाली माकडी यांनी ताब्यात घेवून, तिचेकडे दाखल गुन्हयाच्या अनुषांगने अधिक तपास करता, तीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तीचेकडून दाखल गुन्ह्यातील चोरलेले २,८२,७५०/- रू किचे ब्रेसलेट पंचनाम्याने जप्त करन्यात आले आहे. तसेच महिलेला अधिक विश्वासात घेवून तपास करता, तीने जुन २०२२ मध्ये फिनिक्स मॉल येथील रिलायन्स ज्वेलर्स येथे अश्याच पध्दतीने एक सोन्याची बांगडी चोरुन नेल्याची कबुली दिली. त्याबाबत विमानतळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२२ / २०२२ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
महिलेकडून १) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १२४/२०२३ भा. द. वि. कलम ३८० २ ) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं.२२२ / २०२२ भा.द.वि. कलम ३८० हे दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहे. तर महिला आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईकामी विमानतळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनियकामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक, गणेश माने यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार, संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपिसे, वैशाली माकडी यांनी केली आहे..