ताज्या घडामोडीपुणे

१०५ कोयत्यांसह बेकायदेशीर रित्या कोयत्यांची विक्री करणारा विक्रेता गुन्हे शाखेकडून अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे शहरामध्ये नुकतेच सिंहगड रोड पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन, डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नवीन तयार होणारे गुन्हेगार यांनी आपली सर्वसामान्य नागरींकामध्ये दहशत निर्माण होण्यासाठी भर दिवसा टपरी चालक, हॉटेल मालक, रोडने जाणारे नागरीक यांना धमकी- दहशत निर्माण होण्यासाठी हातात कोयते तलवारी घेवून नागरीकांना त्यांचे हॉटेलमध्ये, टपरीमध्ये, दुकानांमध्ये तसेच नागरीकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्यांवर कोयते मारून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे व्हिडीओ काढून नागरीक समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करून नागरीकांचा जीव किती धोक्यात आहे. याबाबत मेसेज वॉस्टअप टिव्टर, फेसबुक या माध्यमातून पाठवत होते.

मा पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार व मा पोलीस सह आयुक्त श्री.संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस अधिकारी यांची मिटींग घेवून सदर गुन्हेगार यांच्यावर वचक बसविण्यासाठी गुन्हे शाखेकडून वारंवार आरोपी चेकींग तसेच दररोज पेट्रोलींग नेमण्यात आली आहे व यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याबाबत सक्त पेट्रोलींग करण्याचे आदेश दिलेले आहेत.

युनिट – १ चे कार्यक्षेत्रात कॉबीग ऑपरेशन विषेश मोहिमेच्या अंतर्गत कोंबीग ऑपरेशन करून फिरत असताना, पोलीस अंमलदार, अजय थोरात, निलेश साबळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बुधवारपेठ, बोहरी आळी, पुणे या दुकानात हार्डवेअरचे सामान विक्रीचे नावाखाली अनाधिकृतपणे विनापरवाना कोयत्याची विक्री चालु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संदीप भोसले, गुन्हे शाखा युनिट १ पुणे यांचे मार्गदर्शना खाली युनिट – १ चे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ताहीरआली चिल ९३०, बुधवार पेठ, बोहरी आळी, पुणे या हार्डवेअरचे दुकानात छापा टाकून एकुण १०५ कोयते किं रू ४५८००/- चे जप्त करून अनाधिकाराने विक्री करणारा हुसेन खोजेमा राजगरा, वय-३२ वर्ष, यास अटक करण्यात आली आहे.

सदर इसमाविरूध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं. ०९/२०२३, ऑर्म अॅक्ट ४/२५, महा पोलीस अॅक्ट ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे, श्री. गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, रमेश तापकीर, पोलीस अंमलदार अजय थोरात, निलेश साबळे, अमोल पवार, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, विठ्ठल सांळुखे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर यांचे पथकाने केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!