१४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना “गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड” यांनी अडीच तासात ठोकल्या बेडया
धारधार शस्त्र जप्त करुन अपहरण ग्रस्त मुलाची केली सुटका
वर्तमान टाइम्स, वृत्तसेवा :- दिनांक- १२/०९/२०२३ रोजी हिंजवडी पोलीस ठाणे हदितील एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे अपहरण झाले होते ही माहिती पोलिसांना कळताच गुन्हे शाखा युनिट-४ चे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे मुलाचे अपहरण केलेल्या ठिकाणी गेले तसेच सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली त्यात तीन व्यक्ती हे एका निळया रंगाचे झेन गाडी मध्ये अपहरण केलेल्या मुलास घेवुन जात असल्याचे दिसत होते. त्याच दरम्यान अपहरण झालेल्या मुलांच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांका वरुन फोन करुन एका व्यक्ति “३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडुन त्यास मारुन टाकतो” अशा प्रकारचा खंडणीचा फोन करत होता.
अपहरण करणाऱ्या बाबत मिळालेल्या बातमीदारा कडुन व पोशि प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणा वरुन अपहरण करणारे हे सासवड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सपोनि देशमुख, दरोडा विरोधी पथक व पोउपनि रायकर, गुन्हे शाखा युनिट-४ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन माहितीच्या ठिकाणी रवाना करण्यात आली. त्यादरम्यान वपोनि शंकर आवताडे यांनी पोलीस उप अधिक्षक बरडे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांचे पोनि अविनाश शिळीमकर, सासवड पो ठाण्याचे पोनि जाधव, राजगड पो ठाण्याचे पोनि आण्णा घोलप यांना देखिल संपर्क करुन त्यांना सविस्तर प्रकार सांगुन आरोपींचे वर्णन सांगुन तात्काळ नाकाबंदी लावण्यास सांगितले. त्यांनतर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे व सासवड पोलीस ठाणे यांनी योग्य तो समन्वय साधुन तात्काळ प्रतिसाद दिल्याने आवघ्या अडीच तासात सापळा लावुन आरोपी १) तेजस ज्ञानोबा लोखंडे, वय-२१ वर्षे, २) अर्जुन सुरेश राठोड, वय १९ वर्षे, ३) विकास संजय मस्के, वय-२२ वर्षे, या खंडणीखोर तीन आरोपींना शिताफीने झेन गाडीसह ताब्यात घेवुन त्यांचे तावडीतुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात यश मिळाले आहे.
आरोपींकडे मिळुन आलेल्या गाडीतुन तीन मोबाईल फोन, ०१ छन्ऱ्याचे पिस्टल, ०१ अडीच फुट लांबीचा कोयता, ०१ सुरा, छन्नी हातोडा, ०२ मारक असा मुद्देमाल जप्त केला असुन त्यांचे कडे प्राथमिक चौकशी केली असता आरोपी यांनी अपहरण केलेल्या मुलाचे वडीलांबाबत माहिती काढली होती की त्याचा भंगाराचा व्यवसाय असुन त्याचे कडे खुप पैसे आहेत त्याचे मुलाचे अपहरण केले तर खुप पैसे मिळु शकता त्यासाठी त्यांनी पाच दिवस मुलाचे अपहरण करण्यासाठी रेखी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच त्यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी या मुलाचे अपहरण केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. आरोपींनी खंडणी मागण्याकरिता वापरलेले मोबाईल फोन हे भुमकर चौक व मारुजी परिसरातुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपींना पुढील तपासकामी हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- १०६६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३६४ (अ) या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त, मा. श्री. काकासाहेब डोळे सो पोलीस उपआयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सतिष माने साो, सहा. पोलीस आयुक्त, मा. श्री. हिरे सो यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, सपोनि अंबरिष देशमुख, दरोडा विरोधी पथक, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत संद, सुखदेव गावडे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा/नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.