१८ महिन्यापासुन फरार मोक्का गुन्हयातील आरोपीस केले जेरबंद
अलंकार पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी.
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- वारजे पोलीस स्टेशन येथील भा.दं.वि.क. ३९५,३६७,३४१, आर्म अॅक्ट क. ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, मोक्का कलम ३ (१)(ii),३(४) या गुन्ह्यातील आरोपी अक्षय ऊर्फ टिल्या शंत्रुघ्न गायकवाड वय २०, हा गेल्या १८ महिन्यांपासुन फरार होता त्याचा शोध पोलीस सातत्याने घेत होते परंतू आरोपी वेळोवेळी आपली ठिकाणे बदलत असल्यामुळे हा आरोपी मिळून येत नव्हता.
अलंकार पोलीस स्टेशन पुणे शहर कडील सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार शरद चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वारजे पोलीस स्टेशन येथील मोक्का गुन्ह्यातील आरोपी अक्षय ऊर्फ टिल्या शंत्रुघ्न गायकवाड वय २० वर्षे हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कोकण एक्सप्रेस लेन जवळील जितेंद्र अभिषेकी उद्यानाजवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ अलंकार पोलीस स्टेशनकडील पोलीस उप निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सुर्यकांत सपताळे सर्व्हेलन्स पथकातील पोलीस शिपाई शरद चव्हाण, पोलीस नाईक शशिकांत सपकाळ तसेच तपास पथकातील सहा. पोलीस फौजदार महेश निंबाळकर, पोलीस शिपाई आशिष राठोड व पोलीस शिपाई हरीष गायकवाड यांनी माहितीच्या ठिकाणी सापळा रचुन आरोपी अक्षय ऊर्फ टिल्या शंत्रुघ्न गायकवाड याला शिताफिने ताब्यात घेतले आहे पुढील कारवाई करीता वारजे पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त परीमंडळ-०३ पुणे शहर, अप्पासाहेब शेवाळे सहा. पोलीस उप-आयुक्त सिंहगडरोड विभाग पुणे शहर, राजेश तटकरे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस स्टेशन पुणे शहर व संगिता पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलंकार पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरील पथकाने केली आहे.