२७ वर्षापूर्वीच्या खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या..!!
पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ ची उल्लेखनिय कामगिरी..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- साल १९९५ मध्ये भोसरी पोलीस स्टेशन हददीत येथे महिला सुशिलाबाई रामा कांबळे उर्फ लोखंडे या महिलेचा तिचा नवरा रामा पारप्पा कांबळे याने डोक्यात व छातीवर दगडी उखळ मारुन तिचा निर्घुनपणे खुन करुन पळुन गेला होता. त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गु. रजि. नं. २५/१९९५ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी फ़रारी होता. तो त्याच्या मुळगावी कोळनुर पांढरी, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणीही मिळुन येत नव्हता. नातेवाईकांकडेही कोणतीची खत्रीशिर माहिती मिळत नव्हती. त्यामुळे गेले २७ वर्ष खुनासारखा गंभीर गुन्हा करुनही आरोपी मोकाट फिरत होता. त्यास शोधणे पोलीसांसाठी मोठे आव्हान होते.
दरम्यानचे काळात, भोसरी पोलीस ठाणे गु. रजि. नं. ५० / २०२३ भादवि कलम ३५४(अ), ३५४ (क) ३५४ (ड) ५०४, व माहीती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६ (ई),६७, ६७ (ए) अन्वये गुन्हा दाखल होता. गुन्हयातील आरोपी महेश भिमराव कांबळे हाही गुन्हा दाखल झाल्यापासुन फ़रार होता. त्याचा समांतर तपास करत असताना तो त्याचे मुळ गावी कोळनुर पांढरी,उस्मानाबाद गेलेला असल्याचे समजल्यावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच भोसरी पोलीस स्टेशनमधील खुनाचे गुन्हयातील पाहिजे आरोपी हा सुद्धा त्याच गावातील मुळ रहिवासी असल्याने त्याचाही शोध घेण्याबाबत त्यांना आदेश देण्यात आलेले होते.
पथकाने पाहिजे आरोपीचा त्याचे मुळ गावी जावून शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली की वरील खुनाचे गुन्हयातील आरोपीचे गावातील घर बंद आहे परंतू तो अधुन मधुन अचानकपणे गावात येत असतो. तसेच त्याने पालापुर, जिल्हा सोलापुर या गावातील एका महिलेसोबत लग्न केलेले आहे.
या तुटपुज्या माहितीच्या आधारावर पथकाने पालापुर येथे जावुन माहिती घेतली तेथे त्यांना माहिती मिळाली की त्याने त्याचे नाव बदलले असुन तो राम कोंडीबा बनसोडे या नावाने तेथे परिचित आहे. तसेच त्याने पालापुर गावातील स्वाती नावाच्या महिलेसोबत लग्न केलेले असुन ती मुकी आहे त्यास तिन मुले आहेत. तो शेतमजुरी व विट भट्टीवर काम करत त्यांचे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याची माहिती पथकास मिळाली. तो सध्या उसें गाव, ता. मावळ येथे शमशुदीन पठाण यांचे विटभटटीवर कामास असल्याची माहिती त्याना मिळाली पथकाने ती माहिती तात्काळ व.पो.नि. ज्ञानेश्वर काटकर याना दिली असता. व.पो. नि. काटकर व स्टाफ़ने तात्काळ दुसरे पथक घेवुन उसे गावात जावुन तात्काळ तपास करुन रामा पारप्पा कांबळे यास ताब्यात घेतले.
आरोपीकडे तपास करता त्याने चारीत्र्याचे संशायावरुन त्याच्या पत्नीचा खुन केल्याची कबुली दिली. तसेच पोलीसांना गुंगारा देण्यासाठी त्याने त्याचे नाव राम कोंडींबा बनसोडे असे करुन तसे अधारकार्ड व बँक खाते उघडल्याचे तपासात निषन्न झालेले आहे.
आरोपी निष्पन्न असला तरी नाव बदलुन महाराष्ट्रात वेळोवेळी ठिकाण बदलत असल्याने तो गेले २७ वर्ष पोलीसांना गुंगारा देत होता. त्यास पकडण्याचे मोठे अवाहन पोलीसासमोर होते. अथक परीश्रमाने गुन्हे शाखा युनिट-१ चे पथकाने त्यास पकडुन ते पार पाडलेले आहे. दोन्ही गुन्हयातील आरोपीना पुढिल तपासकामी भोसरी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.
अश्या प्रकाराने २७ वर्ष उघडकीस न आलेल्या किचकट गुन्हयाची उकल मा. पोलीस आयुक्त श्री. विनोय कुमार चौबे, मा. सह पो. आयुक्त मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर सो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, स.पो.उप नि. कानडे, पो.हवा. मुल्ला, पो. हवा.बोऱ्हाडे, पो.ह.कमले, पो.ना.हिरळकर, पो.ना.मोरे, पो.शि. जायभाई, पोशि सरोदे, पो.शि.रूपनवर यांचे पथकाने केली आहे. तात्रीक विश्लेषण हे तात्रीक शाखेचे पोलीस हवा. नागेश माळी यांनी करुन तपास पथकास विशेष सहकार्य केलेले आहे.