४८ तासांत सायबर फ्रॉड मधील वाचविले ३.७० करोड, सायबर हेल्पलाईन १९३० ची उल्लेखनिय कामगिरी
२०२३ या एका वर्षभरात सायबर फ्रॉडमधील रुपये २६,४८,२२,२०९/- विविध बँक खात्यात गोठविली
मुंबई दि. ८ निर्भीड वर्तमान:- गुन्हे शाखे अंतर्गत कार्यान्वित असलेल्या सायबर हेल्पलाईन १९३० ची उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली आहे. ४८ तासांत सायबर फ्रॉड मधील तब्बल ३.७० करोड रुपये वाचविण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे, तर मागील वर्षी म्हणजेच सन २०२३ या एका वर्षभरात सायबर फ्रॉडमधील रुपये २६,४८,२२,२०९/- विविध बँक खात्यात गोठविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
४८ तासांत सायबर फ्रॉड मधील कसे वाचविले ३.७० करोड चला तर जाणूण घेऊया:
या प्रकरणातील तक्रारदार यांनी सायबर हेल्पलाईन १९३० यांना तक्रार दिली की त्यांची सोशल मीडिया माध्यमातून संपर्कात आलेल्या फ्रॉडस्टरनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकूण रूपये ४,५६,८४,३५४/- (चार कोटी छप्पन्न लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौपन्न रूपये) ची फसवणूक केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत घडलेल्या घटनेची शहानिशा करून सर्व बॅक ट्रान्झेक्शन फसवणुकीने झाल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले त्यानुसार १९३० सायबर हेल्पलाईन मधील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ एन. सी. सी. आर पोर्टलवर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून सायबर फसवणुकीतील रक्कमेपैकी रूपये ३,७०,४३,५१५/- (तीन कोटी, सत्तर लाख, त्रेचाळीस हजार पाचशे पंधरा रूपये) विविध बँक खात्यात गोठविण्यात आले.
मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी १९३० हेल्पलाईन कार्यान्वित
मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणूक झालेली रक्कम संबधित बॅक खात्यामध्ये गोठविण्याकरिता मुंबई गुन्हे शाखा अंतर्गत १९३० हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे सायबर गुन्हयात आर्थिक फसवणूक झालेले तक्रारदार यांनी त्यांची फसवणूक झालेनंतर १९३० हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क केला असता, त्याची फसवणूक झालेली रक्कम गोठविण्यात येते. त्याचप्रमाणे सन २०२३ मध्ये वर्षभरात सायबर फ्रॉडमधील रुपये २६,४८,२२,२०९/- विविध बँक खात्यात गोठविण्यात आले आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशिकुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त डॉ.डी.एस.स्वामी (सायबर गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुवर्णा शिंदे, पोनि किरण जाधव, पोउनि रूपाली कुलथे, पोउनि मंगेश भोर व १९३० पोलीस पथकाच्या मपोशि सुचेता आचार्य, मीनल राणे, पोह अभिजीत राऊळ यांनी पार पाडली आहे.
याद्वारे पोलिस प्रशासणा तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी सायबर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० हेल्पलाईन वर संपर्क करावा.