पुणे

९ महिन्यापासुन फरार बाल अत्याचार व लैगिंग शोषण करणा-या आरोपीस दत्तवाडी पोलीसांनी केले अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दत्तवाडी पोलीस ठाणे येथे बाल लैगिंग शोषण कायदा कलम (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, यातील अल्पवयीन मुलीस पळवुन लैगिंग अत्याचार करणारा आरोपी हा सतत रांजणगाव,बारामती, डाहाणु पालघर, गुजरात बॉर्डर येथे लपुन बसत होता. व वारंवार पोलीसांना गुंगारा देवुन ठिकाणे बदलुन पिडीत मुलीसह लपत होता.

या गुन्हयाचा तपास सुरु असताना गुन्हयातील आरोपी याचा सोशल मिडीयाच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करुन तपास सुरु असताना दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक यांनी आरोपी हा डाहाणु पालघर येथे असल्याचे समजले होते परंतू पोलीसांची चाहुल लागताच तो तेथुन देखील पळुन गेला होता. त्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत कामठे, पोलीस हवा. कुंदन शिंदे व पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे, सद्दाम शेख यांना गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी हा लक्ष्मीनारायण टॉकिज, पर्वती पुणे येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी खास बातमी दारांकडुन मिळाली.मिळालेली बातमी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तवाडी पोलीस ठाणे श्री.अभय महाजन यांना कळविली असता पो.उप निरी कामठे व तपास पथकाचा स्टाफ तात्काळ रवाना करुन आरोपीस चारही बाजुस सापळा लावुन ताब्यात घेवुन त्यास दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे आणले व अटक करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

दाखल गुन्हयांचा पुढील तपास महिला पोलीस उप. निरीक्षक जाधव दत्तवाडी पोलीस ठाणे या करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डाहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, श्री. राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस स्टेशन, श्री. अभय महाजन पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विजय खोमाणे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक श्री. चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे पाटील, प्रकाश मरगजे, प्रमोद भोसले, किशोर वळे, अमोल दबडे, अनिस तांबोळी, अमित चिव्हे यांनी केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!