ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
50 अंगणवाड्या बळकट करणासाठी दिल्या दत्तक..!!
विविध सामाजिक संस्था सोबत सामंजस्य करार..!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- अंगणवाड्यांच्या बळकटीकरण करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महिला व बालकल्याण विभाग आणि जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
लोकसहभागातून अंगणवाड्या बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून अंगणवाडी केंद्र दत्तक देऊन अंगणवाडी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या अंतर्गत करार करून ५० अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत – महिला व बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा