ACB : लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक व हवालदार ACB च्या जाळ्यात
कळवा | निर्भीड वर्तमान:- अॅल्युमिनीयम पट्टीने भरलेला आयशर टेम्पो सोडवण्यासाठी पोलीसांनी मागितली होती दोन लाखांची लाच, लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सविस्तर : या प्रकरणातील तक्रारदार यांचा अॅल्युमिनीयमच्या पट्टी बनवणाऱ्या वाडीवरे नाशिक येथे कारखाना आहे. बनविलेल्या पट्टय़ा ते मुंबईला विक्री करतात तोच माल घेऊन मुंबईला त्यांचा आयशर टेम्पो दिनांक १६/०४/२०२४ रोजी कळवा पोलीस ठाणे, येथील अधिकारी यांनी मालासह पकडला होता. आपला माल सोडवण्यासाठी कारखाना मालक कळवा पो.स्टे. येथे गेले असता तेथील पोहवा दराडे यांनी तक्रारदार यांना त्यांचा माल आणि आयशर टेम्पो सोडवण्यासाठी स्वतः करीता तसेच तपास अधिकारी पोउपनि पोतेकर व वरिष्ठ पो.नि. उतेकर यांना देण्या करीता एकूण दोन लाख रुपयांची मागणी केली आणी पैसे दिले नाही तर माल आणि गाडी पोलीस ठाणे येथे सडत राहील अशी धमकी दिली होती तर दिनांक २४/०४/२०२४ पर्यंत दोन लाख रुपये घेवून येण्यास सांगितले होते.
कारखानदार यांना लाच देणे मान्य नसल्याने या सर्व प्रकारा बाबत त्यांनी दि. २४/०४/२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे येथे तक्रार दिली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक २४/०४/२०२४ रोजी पडताळणी केली असता लोकसेवक १) माधव अर्जुन दराडे, पोहवा/४९५० नेम. कळवा पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे आणि लोकसेवक २) पोउपनि/तुषार तानाजी पोतेकर नेम. कळवा पोलीस स्टेशन, यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्यावरून लाप्रवि ठाणे यांनी सापळ्याचे आयोजन करून पो.हवा. माधव दराडे यांना तकारदार यांच्याकडुन कळवा पोलीस ठाणे समोरील रस्त्याच्या बाजूला मोकळया जागेत १,९०,०००/-रू. लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन्ही लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.