ACB; सहाय्यक पोलीस निरीक्षक लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात
भिवंडी, निर्भीड वर्तमान:- खुनाच्या गुन्हामधील आरोपीस मदत करण्यासाठी लाच घेतांना सह्हाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB); रंगेहाथ पकडले आहे.
सविस्तर;
“नारपोली पोलीस स्टेशन, भिवंडी याठिकाणी भादवि कलम ३०२ नुसार तक्रारदार यांच्या मुलावर गुन्हा दाखल आहे. मुलाचे दोषारोप तयार करण्यात आले असून त्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्या मुलाला ५ नंबरचा आरोपी दाखविण्याकरीता गुन्हयाचे तपासिक अधिकारी सह्हाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाखाची मागणी करून तडजोडीअंती २ लाख रूपये स्विकारण्याचे मान्य केले होते.
लाच देण्याचे मान्य नसल्याने महिला तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB); यांच्याकडे सदर प्रकरणाची तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हयात कायदेशीर बांबीची पुर्तता करून सापळा रचला असता आरोपी पवार यांनी तक्रारदार यांना पैसे घेवून पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले व तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम घेताना ला.प्र.विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सपोनि पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुढील कारवाई चालू आहे.
सदर कारवाईसाठी मार्गदर्शन मा. श्री. सुनिल लोखंडे साो. पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. मा. श्री. अनिल घेरडीकर साो. अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. मा. श्री. सुधाकर सुरवाडकर साो. अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांनी केले असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबददल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्र, ठाणे यांचेशी संपर्क करावा.