Dalit Panther : दलित पॅंथर संघटनेचा 52 वा वर्धापन दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांना खाऊ व ब्लॅंकेट वाटप

पुणे, दि.9:- दलित पॅंथर संघटनेचा 52 वा वर्धापन दिनाच्या औचित्य साधून निवासी मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तर एचआयव्ही बाधित मुलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले आहे

पुणे स्टेशन येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम धायरी येथील ज्ञानगंगा निवासी मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

त्यानंतर आनंद विहार हिंगणे खुर्द येथील ज्ञानदीप निवासी मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले

कात्रज येथील ममता फाउंडेशन एचआयव्ही बाधित मुलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

अशा प्रकारे दलित पॅंथर संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात संघटना श्रेष्ठी आदरणीय मल्लिका ताई ढसाळ,राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. बाबासाहेब गायकवाड, मा . महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण चौधरी, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. राहुल गायकवाड, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष मा.अजय भालशंकर,पुणे शहराध्यक्ष मा. रोहन गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. अतुल गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. अभिषेक मुंढे आदी उपस्थित होते.

by Team Nirbhid Vartamaan

Exit mobile version